Arjun Tendulkar : भारतीय क्रिकेट टीमचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा मैदानात आणि मैदानाबाहेर शांत स्वभाव आपण प्रत्येकाने पाहिला आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटच्या जगातील खरा जेंटलमन म्हटलं जातं. असं फार क्वचितच घडलं असेल, जेव्हा सचिन मैदानाबाहेर संतापलेला दिसला. मात्र या उलट त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) असल्याचं दिसतंय.


अर्जुनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) चा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुनचे काही चाहते Arjun Tendulkar चा फोटो काढण्यासाठी प्रयत्न करतात. यावेळी अर्जुन त्यांच्याशी उद्धटपणे बोलताना दिसतोय. अर्जुनचा हाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


अर्जुनला त्याच्या काही चाहत्यांनी रेस्ट्रॉरंटच्या बाहेर स्पॉट केलं. यावेळी अर्जुनसोबत काही सुरक्षा रक्षकही होते. अर्जुन जसा रेस्ट्रॉरंट बाहेर आला, तसं त्याला चाहत्यांनी घेरलं आणि त्याचे फोटो काढले. यावेळी चाहते त्याला विचारतात की, अर्जुन कसा आहेस. अर्जुनही त्यांना मस्त आहे, असं उत्तर देतो. मात्र यावेळी सतत फोटोसाठी थांबवल्याने अर्जुन काहीसा वैतागतो आणि चाहत्यांना उद्धटपणे विचारतो, झाले काढले? असं विचारून तो गाडीत बसून निघून जातो.



रणजीमध्ये Arjun Tendulkar ची घातक गोलंदाजी


रणजी ट्रॉफीमध्ये 2022-23 मध्ये अर्जुन तेंडुलकर गोव्याच्या टीमकडून खेळताना दिसला. गोव्याकडून खेळताना त्याने चांगलं प्रदर्शन केलं. देशांतर्गत टूर्नामेंटमध्ये खेळताना या युवा ऑलराऊंडरने आतापर्यंत 7 सामन्यांमध्ये किफायतशीर गोलंदाजी केली आहे. या सामन्यांमध्ये अर्जुनने 12 खेळाडूंना माघारी धाडलं आहे. 


7 सामन्यांमध्ये अर्जुन 3 वेळा 2 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला आहे. त्याच्या गोलंदाजीसमोर विरोधी टीमच्या गोलंदाजांना फलंदाजी करणं कठीण काम असायचं. याचमुळे डेब्यू सामन्यात त्याने 105 रन्सपेक्षाही कमी रन्स खर्च केले.


फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला Arjun Tendulkar


रणजी ट्रॉफीमध्ये 2022-23 मध्ये अर्जुन तेंडुलकर विरोधकांच्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला. अर्जुनने त्याच्या डेब्यू सामन्यामध्ये 104 रन्स देऊन 3 विकेट्स पटकावले होते. या उत्तम खेळीच्या जोरावर इतर सामन्यांसाठी गोव्याच्या टीममध्ये त्याने त्याची जागा निश्चित केली. अर्जुनच्या या कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये लवकरच त्यांची एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जातंय.  टीम इंडियाला अर्जुन सारख्या ऑलराऊंडरची गरज आहे. 


डेब्यू सामन्यात अर्जुनने केलं होतं शतक


गोव्याकडून पदार्पण करताना अर्जुनने 179 चेंडूत शानदार शतक पुर्ण केले. गोवा विरूद्ध राजस्थानच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने शानदार फलंदाजी करत विरोधी संघाला रोखून धरले. अर्जुन तेंडुलकरने 178 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केलं होतं.