Arjun Tendulkar On Mankading: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा (Sachin Tendulakr Son) अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) रणजी ट्रॉफी स्पर्धेत शानदार कामगिरी करताना दिसतोय. अर्जुनला गोव्याकडून (Ranji Trophy) खेळण्याची संधी मिळाली. अर्जुन मुंबईकडून खेळेल, अशी अपेक्षा असताना त्याला संघात स्थान मिळालं नाही. त्यानंतर त्याने गोव्याकडून खेळताना वादळ निर्माण केलं. अशातच आता अर्जुनच्या एका वक्तव्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे. अर्जुनने थेट कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit sharma) विरुद्ध दंड थोपटले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून मंकेडिंगवर (Mankading) बरीच चर्चा होत आहे. त्यामुळे अनेक वाद देखील उभा राहिल्याचं पहायला मिळतंय. क्रिकेट जगतात मंकेडिंगबद्दल दोन मतं आहेत. काहीजण हा नियम योग्य मानत आहेत. तर काही जण नियम चुकीचा असल्याचं मत मांडतायेत. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने मंकेडिंगवर (Arjun Tendulkar On Mankading) आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलंय.


मी मंकेडिंगला चुकीचा मानत नाही, कारण तो पूर्णपणे क्रिकेटच्या नियमांत (Cricket law) येतो. पण जे याला खेळाच्या भावनेच्या विरुद्ध मानतात त्यांच्याशी मी सहमत नाही, असं अर्जुन तेंडूलकर म्हणाला आहे. एवढी मोठी धाव घेत येणं, त्यानंतर नजर ठेऊन मंकडिंग करून त्याची अपील मागे घेणे म्हणजे मेहनतीवर पाणी फेरणं आहे, असंही तो (Arjun Tendulkar) म्हणालाय.


आणखी वाचा - मैदानात Shubman Gill ला पाहतात 'सारा-सारा' ओरडले चाहते; खेळाडूने दिलं असं रिएक्शन की...!


दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या (Ind vs Sri) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद शमीने ( Shami Mankading) अखेरच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना श्रीलंकेच्या दासून शनाकाला मंकेडिंग करत बाद केलं होतं, परंतु रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सांगण्यावरून त्यानं अपील केली नाही, ज्यामुळे शनाका बाद होण्यापासून वाचला आणि त्याने शतक पूर्ण केलं होतं.