मैदानात Shubman Gill ला पाहतात 'सारा-सारा' ओरडले चाहते; खेळाडूने दिलं असं रिएक्शन की...!

शुभमन त्याच्या खेळाच्या परफॉर्मन्ससोबत पर्सनल लाईफवरून देखील चांगलात चर्चेत असतो. शुभमन आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांचं अफेअर असल्याची चर्चा आहे. याचमुळे शुभमनला पाहुन त्याचे चाहते सारा-सारा ओरडू लागल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Updated: Jan 17, 2023, 09:02 PM IST
मैदानात  Shubman Gill ला पाहतात 'सारा-सारा' ओरडले चाहते; खेळाडूने दिलं असं रिएक्शन की...! title=

Shubman Gill Team India: भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) सध्या उत्तम फॉर्ममध्ये दिसतोय. नुकतंच श्रीलंकेविरूद्ध झालेल्या वनडे सिरीजच्या शेवटच्या सामन्यात गिलने शतक मारलं. शुभमन त्याच्या खेळाच्या परफॉर्मन्ससोबत पर्सनल लाईफवरून देखील चांगलात चर्चेत असतो. शुभमन आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांचं अफेअर असल्याची चर्चा आहे. याचमुळे शुभमनला पाहुन त्याचे चाहते सारा-सारा ओरडू लागल्याचा प्रकार समोर आला आहे. 

शुभमन आणि सारा गेल्या अनेक काळापासून एकत्र असल्याच्या अफवा आहेत. ते दोघं-एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा यापूर्वी अनेकदा रंगली होती. मात्र याबाबत दोघांपैकी कोणीही अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही. इतकंच नाही तर यापूर्वी शुभमन गिल आणि सारा अली खान यांच्या डेटींगचीही चर्चा जोरदार रंगली होती. 

मात्र या सर्व गोष्टींमध्ये किती प्रमाणात तथ्य आहे, हे शुभमनच सांगू शकतो. शुभमन भारत-श्रीलंका यांच्यामध्ये झालेल्या सामन्यावेळी बाऊंड्री लाईनच्या जवळ होता. तेव्हा त्याला पाहून चाहते सारा-सारा ओरडू लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारताने श्रीलंकेविरूद्धच्या वनडे सिरीजमध्ये 3-0 असा विजय मिळवला होता. या सिरीजमध्ये शुभमनने सर्वाधिक रन्स करण्याच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर होता. या 3 सामन्यांमध्ये त्याने 207 रन्स केलेत. तर शेवटच्या सामन्यामध्ये त्याने 97 बॉल्समध्ये 116 रन्स केले होते. यामध्ये शुभमनने 14 फोर आणि 2 सिक्स लगावले होते.

पहिल्या सामन्यात शुभमन गिलचा रूद्र अवतार 

श्रीलंकेविरूद्धच्या वनडे सिरीजच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाची ओपनिंग जोडी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र मैदानात या दोघांमध्ये वाद झाल्याचंही दिसून आलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलने हाफ सेंच्युरी करत चांगली सुरुवात केली. मात्र शतकाकडे वाटचाल करताना त्याची विकेट गेली आणि रोहितसोबत त्याचा वाद झाल्याची घटना घडली. यावेळी पव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने अपशब्द वापरल्याचंही कॅमेरात कैद झालं आहे.

कर्णधार रोहित शर्मावर वैतागला Shubman Gill 

प्रथम फलंदाजी करण्यासाठी शुभमन गिल आणि रोहित शर्मा उतरले. या दोघांनीही शतकी पार्टनरशिप केली. दोन्ही खेळाडू सेट झाले असताना शुभमन गिल आऊट झाला. यावेळी पव्हेलियनमध्ये परतत असतात तो रोहित शर्मावर नाराज असल्याचं दिसून आलं.