Arjun Tendulkar : अखेर अर्जुन तेंडुलकरची अचानक टीममध्ये एन्ट्री; सिलेक्टर्सचा मोठा निर्णय
Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरच्या ( Arjun Tendulkar ) नावाची प्रचंड चर्चा झाली. आयपीएलनंतर अर्जुन ( Arjun Tendulkar ) नशीब चमकलंय. जवळपास 3 वर्षांनंतर अर्जुनने आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) डेब्यू केलं.
Arjun Tendulkar : यंदाच्या आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकरच्या ( Arjun Tendulkar ) नावाची प्रचंड चर्चा झाली. जवळपास 3 वर्षांनंतर अर्जुनने आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) डेब्यू केलं. दरम्यान आयपीएलनंतर अर्जुन ( Arjun Tendulkar ) नशीब चमकलंय. अर्जुनला आगामी देवधर ट्रॉफीसाठी टीममध्ये संधी देण्यात आली आहे. 24 जुलैपासून सुरु होणार आहे. 50 ओव्हर्सच्या या सामन्यांच्या सिरीजमध्ये मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखाली अर्जुनला टीममध्ये संधी देण्यात आली आहे.
अर्जुनचं नशीब अखेर फळफळलं
यंदाच्या आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar ) मुंबई इंडियन्सकडून डेब्यू केला होता. यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याला ऑगस्टमध्ये एमर्जिंग ऑलराउंडर खेळाडूंच्या शिबिरातही स्थान दिलं. त्यानंतर आता अर्जुनला आंतर विभागीय स्पर्धा देवधर करंडकमध्ये संधी मिळाली आहे.
रणजीमध्ये अर्जुनची उत्तम कामगिरी
अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar ) गोव्याच्या टीमकडून रणजी ट्रॉफीमध्ये डेब्यू केला होता. यावेळी पहिल्याच सामन्यात त्याने शतक ठोकत वडील सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डशी बरोबरी केली होती. रणजीमध्ये मुंबईकडून संधी मिळत नसल्याने त्याने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता.
आयपीएलमध्ये कशी होती अर्जुनी कामगिरी
कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar ) मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्य डेब्यू केलं होतं. यावेळी त्याला मुंबईकडून केवळ 4 सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या 4 सामन्यांमध्ये त्याला 3 विकेट्स घेण्यात यश आलं. याशिवाय एका सामन्यमध्ये त्याला फलंदाजीचीही संधी मिळाली. यावेळी त्याने 9 बॉल्समध्ये 13 रन्स केले. मात्र यानंतर त्याला मुंबईच्या टीममध्ये संधी देण्यात आली नाही.
कशी असेल टीम
मयांक अग्रवाल (कप्तान), रोहन कुन्नुमल, एन जगदीशन, रोहित रायुडू, केबी अरूण कार्तिक, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, वाशिंगटन सुंदर, विद्वत कावेरापा, विजयकुमार विशाक, कौशिक वी, रोहित रेडकर, सिजोमन जोसेफ, अर्जुन तेंडुलकर आणि बी साई किशोर