Arjun Tendulkar : शीsss...! नाकात घातलेलं तेच बोट तोंडात, अर्जुनचा किळसवाणा प्रकार कॅमेरात कैद
उत्तम प्रदर्शन केल्यानंतर अर्जुनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये अर्जुनने केलेलं घाणेरड्या कृत्य पाहून सर्वच जण हैराण झालेत.
Arjun Tendulkar : अहमदाबाद स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सचा 55 रन्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) विश्वास ठेवत अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) पुन्हा एकदा संधी दिली. यावेळी अर्जुननेही कमबॅक करत मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. मात्र या सामन्यात अर्जुनने एक असं कृत्य केलंय, जे पाहून तुम्हालाही घाण आणि किळस वाटेल.
गुजरातविरूद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने फार चांगली गोलंदाजी केली. अर्जुनने या सामन्यात 2 ओव्हर टाकत 9 रन्स देत 1 विकेट काढली आहे. हे उत्तम प्रदर्शन केल्यानंतर अर्जुनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये अर्जुनने केलेलं घाणेरड्या कृत्य पाहून सर्वच जण हैराण झालेत.
अर्जुनचं किळसवाणं कृत्य कॅमेरात कैद
अर्जुनचा एक नऊ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये अर्जुन विचित्र आणि घाणेरडं कृत्य करताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल आणि म्हणाल की, इतक्या मोठ्या खेळाडूचा मुलगा असं कृत्य कसं करू शकतं.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येतंय की, अर्जुन नाकामध्ये एक बोट घालतो आणि तेच बोट तो तोंडात घातलाना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही लगेच, शीsss... म्हणाल. असं कृत्य अनेक खेळाडू मैदानावर करताना दिसतायत. तर आता अर्जुनचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. (दरम्यान हा व्हिडीओ खरा आहे की, एडिटेड आहे, याची खात्री झी 24 तासने केलेली नाही.
अर्जुनने आयीपएलमध्ये पहिल्यांदाच केली फलंदाजी
गुजरातने दिलेल्या 208 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांची नाकीनऊ आली. या सामन्यामध्ये अर्जुन तेंडुलकरला देखील फलंदाजी करण्याची संधी मिळाली. यावेळी अर्जुनने 9 बॉल्समध्ये 13 रन्सची खेळी केली. यामध्ये त्याने एक उत्तम अशी सिक्स देखील लगावली.