Arjun Tendulkar : अखेर 14 वर्षांनंतर वडिलांचा बदला त्याने घेतलाच! पाहा अर्जुनने नेमकं काय केलं?
सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने हैदराबादची शेवटची विकेट काढत मुंबईच्या टीमला विजय मिळवून दिला. मात्र यासोबतच अर्जुनने 14 वर्षांपूर्वीचा वडिलांचा बदला घेतला.
Arjun Tendulkar took revenge for dad: गेल्या 3 वर्षांपासून सचिन तेंडुलकरचा (Sachin tendulkar) मुलगा जे स्वप्न पाहत होता, अखेर ते मंगळवारी पूर्ण झालं आहे. हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ला पहिली विकेट मिळाली आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात अर्जुनने स्वतःच्या आयपीएल करियरमधील पहिली विकेट तर काढलीच शिवाय आपल्या वडिलांचा म्हणजेच सचिनचा बदला (Arjun Tendulkar takes revenge for dad) देखील घेतलाय.
यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सने विजयाची हॅट्रिक केली. हैदराबादचा 14 रन्सने पराभव करत पॉईंट्स टेबलमध्ये 6 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने हैदराबादची शेवटची विकेट काढत मुंबईच्या टीमला विजय मिळवून दिला. मात्र यासोबतच अर्जुनने 14 वर्षांपूर्वीचा वडिलांचा बदला घेतला.
भुवनेश्वर कुमार झाला अर्जुनचा शिकार
अर्जुन तेंडुलकरने हैदराबादचा खेळाडू भुवनेश्वर कुमारची विकेट घेतली. हीच त्याची पहिली विकेट ठरली. दरम्यान जवळपास 14 वर्षांपूर्वी भुवनेश्वरने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ला रणजी ट्रॉफीच्या सामन्यामध्ये शून्यावर बाद केलं होतं. मुख्य म्हणजे भुवनेश्वर कुमार हा पहिला असा गोलंदाज होता, ज्याने सचिनला रणजीमध्ये शुन्यावर आऊट केलं होतं
भुवनेश्वर कुमारने विकेट काढण्यापूर्वी कधीही सचिन रणजी फॉर्मेटमध्ये शून्यावर बाद झाला नव्हता. त्यावेळी भुवनेश्वरने सचिनची विकेट घेऊन इतिहास रचला होता.
अर्जुनने घेतला वडिलांचा बदला
अर्जुनने आयपीएलमध्ये त्याची पहिली विकेट भुवनेश्वर कुमारची पटकावली. अशा पद्धतीने आता 14 वर्षांनंतर सचिनचा मुलगा अर्जुनने घेतलाय. अर्जुनने हैदराबादविरूद्ध 20 वी ओव्हर फेकताना पाचव्या बॉलवर भुवनेश्वरची विकेट काढली. या बॉलवर सिक्स मारण्याच्या नादात रोहित शर्माकडे कॅच देऊन बसला.
अर्जुनच्या विकेटनंतर सचिन खूश
सामना सुरु असताना सचिन तेंडुलकर डग आऊटमध्ये बसला होता. ज्यावेळी अर्जुनने विकेट काढली तेव्हा त्याच्यासोबत बसलेल्या पियुष चावला आणि तिलक वर्माला त्याने मिठी मारली. या घटनेचा व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होताना दिसतंय.
वडिलांविषयी काय म्हणाला अर्जुन?
हैदरबादच्या सामन्यानंतर अर्जुनला सचिनसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना तो म्हणाला, सामन्यापूर्वी आम्ही डावपेचांवर चर्चा करतो. सचिनच्या म्हणण्यानुसार, जर गोलंदाजी दरम्यान बॉल स्विंग झाला तर तो एक बोनस आहे. मात्र जर बॉल नाही स्विंग झाला, तर लाईन लेंथने गोलंदाजी करावी.