Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरला ( Sachin Tendulkar ) क्रिकेटचा देव मानलं जातं. सचिनने त्याच्या खेळाच्या जीवावर संपूर्ण जगभरात स्वतःचं नाव कमावलं. त्यांच्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अनेक रेकॉर्ड्स स्वतःच्या नावे केले. दरम्यान आता चाहते अशीच कामगिरी त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) करेल अशी आशा बाळगून आहेत. नुकतंच अर्जुनने आयपीएलमध्ये डेब्यू केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सकडून अर्जुनने ( Arjun Tendulkar ) केवळ 4 सामने खेळले आहेत. या सामन्यामध्ये अर्जुनने 3 विकेट्स घेतले आहेत. दरम्यान यावेळी सचिनने ( Sachin Tendulkar ) अर्जुनबाबत एक खुलासा केला आहे. 


अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) गेल्या जवळपास 3 वर्षांपासून आयपीएलमध्ये डेब्यूची प्रतिक्षा करत होता. यंदाच्या आयपीएलमध्ये अखेर अर्जुनचा मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली. यावेळी अर्जुनचे वडील सचिन तेंडुलकरसोबत ( Sachin Tendulkar ) बहीण सारा तेंडुलकर देखील स्टेडयममध्ये उपस्थित होते. 


मात्र यावेळी सचिन तेंडुलकर डगआऊटमध्ये बसून नाही तर ड्रेसिंग रूममध्ये बसून पडद्याच्या मागून सामना पाहत होता. सचिनने ( Sachin Tendulkar ) असं का केलं याचं उत्तर अखेर त्यानेचं दिलं आहे.


सचिन तेंडुलकर( Sachin Tendulkar ) याविषयीचा किस्सा शेअर करताना म्हणाला, ज्यावेळी मी लहान होतो तेव्हा माझं कुटुंब माझी फलंदाजी पाहण्यासाठी यायचे. तेव्हा माझ्या कुटुंबातील व्यक्तींना सतत मोठ्या स्क्रिनवर दाखवलं जायचं. मात्र असं झाल्याने मी नर्वस व्हायचो आणि माझा खेळ चांगला व्हायचा नाही. 


सचिन पुढे म्हणाला, ज्यावेळी मुंबई इंडियन्सकडून ( Sachin Tendulkar ) अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar ) डेब्यू केला तेव्हा माझी इच्छा नव्हती की, त्याला देखील माझ्यासारखा अनुभव यावा. त्याचा खेळ चांगला व्हायला हवा होता. त्यामुळे मी ड्रेसिंग रूममध्ये होतो. 


अर्जुन तेंडुलकरची आयपीएलमधील कामगिरी


वानखेडे स्टेडियमवर म्हणजेच आपल्या होम ग्राऊंडवर अर्जुनने ( Arjun Tendulkar ) त्याचा डेब्यू केला. कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध त्याने पहिला सामना खेळला. आयपीएलमध्ये अर्जुनने एकूण 4 सामने खेळले. या चार सामन्यांमध्ये अर्जुनने 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय त्याला एकदा फलंदाजीचीही संधी मिळाली. यावेळी त्याने 9 बॉल्समध्ये 13 रन्स केले होते.