Arjun Tendulkar : आयपीएल (IPL 2023) सिझनच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमची कामगिरी म्हणावी तशी चांगली झाली नव्हती. मात्र या टीमने उत्तम पद्धतीने कमबॅक करत पॉईंट्स टेबलमध्ये (IPL 2023 Points Table) तिसरं स्थान गाठलं आहे. दरम्यान आतापर्यंत झालेल्या सामन्यांनंतर मुंबईच्या टीमच्या गोलंदाजांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागलाय. याशिवाय रोहित देखील अनेक नवख्या गोलंदाजांना टीममध्ये संधी देतोय. मात्र अशातच चाहत्यांच्या मनात एक प्रश्न आहे, तो म्हणजे 4 सामने खेळून झाल्यानंतर अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) गायब झाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकात्या विरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आयपीएलमध्ये डेब्यू केलं आहे. यानंतर त्याला केवळ 4 सामने खेळण्याची संधी दिली. मात्र त्यानंतर अर्जुनला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दरम्यान आता चाहत्यांना प्रश्न असा आहे की, अर्जुन तेंडुलकरला पुन्हा टीममध्ये संधी मिळणार का?


अर्जुनच्या जागी कोणाला मिळाली संधी?


रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीममध्ये अर्जुन तेंडुलकरच्या जागी अर्शद खान आणि आकाश मधवाल यांना संधी दिली होती. मात्र एकंदरीत या दोन्ही गोलंदाजांची इकोनॉमी पाहता, अर्जुनला संधी देणं फायद्याचं ठरेल. अर्शद आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये 13 च्या इकोनॉमीने रन्स खर्च केले. तर दुसरीकडे आकाशने 3 सामन्यामध्ये 10 पेक्षा जास्त इकोनॉमीने रन्स खर्च केलेत.


अर्जुनची कामगिरी कशी आहे?


या दोघांच्या इकोनॉमीपेक्षा अर्जुनची इकोनॉमी फार चांगली आहे. अर्जुनने आतापर्यंतम मुंबई इंडियन्सकडून 4 सामने खेळले असून 3 विकेट्स काढल्यात. यावेळी त्याने 9 च्या अधिक इकोनॉमीने रन्स दिलेत. त्यामुळे मुंबईच्या आता आगामी सामन्यांमध्ये रोहित शर्मा अर्जुन तेंडुलकरला संधी देणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


रोहित शर्मा का ठेवतोय अर्जुनला बाहेर?


पंजाबविरुद्धच्या सामन्यात अर्जुनने पॉवरप्लेमध्येही विकेट घेतली. मात्र याच सामन्यात त्याने त्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 31 रन्स खर्च केले. यानंतर मुंबईचा गुजराविरूद्ध सामना झाला. या सामन्यात रोहित शर्माने अर्जुनला 2 ओव्हर टाकण्यासाठी दिल्या. पण यानंतर चार बॅक टू बॅक मॅचमध्ये त्याला संधीही मिळाली नाही. येत्या मंगळवारी मुंबईचा सामना लखनऊशी होणार आहे. या सामन्यात अर्जुनला संधी मिळते का, हे पाहावं लागणार आहे.