MI vs GT : पंड्याविरूद्ध रोहित वापरणार का `अर्जुन अस्त्र`? कशी असेल प्लेईंग 11
Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात टायटन्स हा जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न मुंबईची टीम करणार आहे. आजच्या या सामन्यात रोहित शर्माचा समावेश करणार का पहावं लागणार आहे.
Arjun Tendulkar : आयपीएलमध्ये आज वानखेडेच्या स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगणार आहे. यापूर्वी अहमदाबादमध्ये रंगलेल्या सामन्यात मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये गुजरात टायटन्सने मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई गुजरातचा पराभूत करून बदला घेणार का, हे पाहवं लागणार आहे. यासाठी मुंबईची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर सर्वांचं लक्ष असणार आहे.
रोहित शर्मा करणार का टीममध्ये बदल?
आजचा सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न मुंबईची टीम करणार आहे. गेल्या 2 सामन्यांमध्ये टीमचा युवा स्टार फलंदाज तिलक वर्माला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली नव्हती. तर आजच्या सामन्यात तिलकचा समावेश केला जाऊ शकतो. यंदाच्या सिझनमध्ये तिलकची कामगिरी देखील चांगली झालीये.
आयपीएल 2023 मध्ये तिलकने आतापर्यंत 9 सामने खेळले असून यामध्ये त्याने 158.38 च्या स्ट्राईक रेटने रन्स केलेत. त्याच्या एकूण रन्सवर नजर टाकली तर त्याने एकूण 274 रन्स कुटलेत. गेल्या 2 सामन्यांमध्ये तो आजारी असल्याने त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला नव्हता.
अर्जुन तेंडुलकरचं होणार कमबॅक
गेल्या काही सामन्यांपासून अर्जुन तेंडुलकरचाही टीममध्ये समावेश करण्यात येत नाहीये. अर्जुनने तब्बल 3 वर्षांनंतर आयपीएलमध्ये डेब्यू केला. मात्र त्याला केवळ 4 सामने खेळण्याची संधी दिली. रोहितने अर्जुनच्या जागी गोलंदाज अरशद खानला संधी देण्यात आलीये. मात्र पंजाबकिंग्जविरूद्धच्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 48 रन्स दिले आणि एक विकेट काढली. यानंतर चेन्नईविरूद्धच्या सामन्यात 1.4 ओव्हरमध्ये 28 रन्स दिले. त्यामुळे त्याचीही कामगिरी फारशी चांगली झालेली नाही.
अर्जुनची आयपीएलमधील एकूण कामगिरी
अर्जुनने कोलकाताविरूद्धच्या सामन्यात डेब्यू केलं. यानंतर हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अर्जुनने आयपीएल करियरमधील पहिली विकेट काढली. अर्जुनने आतापर्यंत आयपीएलमधील 4 सामने खेळले असून 3 विकेट्स काढण्यात त्याला यश मिळालयं. यासोबत तो एकदा फलंदाजीलाही उतरला होता. यावेळी 9 बॉल्समध्ये अर्जुनने 13 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये एका सिक्सचाही समावेश होता.
कशी असेल प्लेईंग
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेविड, तिलक वर्मा, कुमार कार्तिकेय, अर्जुन तेंडुलकर, क्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ