Arjun Tendulkar : `या` दिवशी आणि `या` टीमविरूद्ध अर्जुन IPL मध्ये डेब्यू करण्याची शक्यता!
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याच्या नावाचा सबस्टिट्यूटच्या यादीत देखील समावेश करण्यात आला होता. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्यात आलं नाही.
Arjun Tendulkar : आयपीएलमध्ये (IPL 2023) दररोज एक-ना एक रोमांचक सामने पहायला मिळतात. यामध्ये कोणी नवखा खेळाडू उत्तम खेळी करून त्याच्या नावाची छाप मागे सोडतो. काही खेळाडू त्यांच्या डेब्यू सामन्यातच तुफान फलंदाजी करतात. अशातच आता सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) चाहत्यांना उत्सुकता आहे ती, अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) डेब्यूची. कदाचित लवकरच चाहत्यांची ही इछा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याच्या नावाचा सबस्टिट्यूटच्या यादीत देखील समावेश करण्यात आला होता. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्यात आलं नाही. मात्र रविवारी होणाऱ्या सामन्यात त्याचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
KKR विरूद्ध अर्जुनला खेळवणार?
गेल्या 2 वर्षांपासून अर्जुनचा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात समावेश आहे. मात्र आतापर्यंत एकदाही त्याला खेळण्याची संधी देण्यात आलेली नाही. दुसरीकडे यंदाच्या सिझनमध्ये मुंबईची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. मुंबईला 3 सामन्यांमध्ये केवळ एका सामन्यात विजय नोंदवता आला आहे. अशा परिस्थितीत रविवारी होणाऱ्या सामन्यात नवख्या खेळाडूंना संधी मिळू शकते.
या खेळाडूला रिप्लेस करणार अर्जुन?
टीमची एकंदरीत कामगिरी पाहिली तर अनेक गोलंदाजांचा खेळ चांगला झालेला नाही. अशामध्ये स्पिन ऑलराऊंडर ऋतिक शौकीनचा खेळ फारसा चांगला झाला नाही. गोलंदाजीमध्येही तो महागडा पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे ऋतिकच्या जागी अर्जुनच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. केकेआर विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा अर्जुनला संधी देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
चाहत्यांच्या मनात हा प्रश्न आहे की, अजूनही रोहित अर्जुनला टीममध्ये संधी का देत नाही. दरम्यान रोहित शर्मा कदाचित अर्जुनला आयपीएलच्या स्तराचा खेळाडू समजत नसावा. याच कारणामुळे रोहित अर्जुनला मुंबईच्या टीममध्ये संधी देत नाहीये. तर दुसरं कारण म्हणजे अर्जुनचा फर्स्ट क्लास क्रिकेटमधील रेकॉर्ड फारसा चांगला नाही.
कसा आहे अर्जुनचा रेकॉर्ड?
अर्जुनने फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलं आहे. यामध्ये 7 सामन्यांमध्ये त्याचा समावेश केला गेला होता. या 7 सामन्यांच्या 11 इनिंग्समध्ये 3.42 च्या इकोनॉमीने 12 विकेट्स काढलेत. दुसरीकडे लिस्ट-A च्या एकूण 7 सामन्यामध्ये त्याने 4.98 च्या इकॉनॉमीने 8 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी-20 सामन्यांमध्येही त्याच्या चांगल्या कामगिरीची नोंद नाहीये.