Arjun Tendulkar: मुंबईच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सचिनचा लेकाचा भेदक यॉर्कर, स्पीड पाहून बॅटरही कोसळला; पाहा Video
Arjun Tendulkar: आयपीएलच्या 16 व्या सिझनमध्ये अर्जुन तेंडुलकरला म्हणावं तसं संधीचं सोनं करता आलं नाही. मात्र येत्या सिझनमध्ये आपल्या खेळाची जादू दाखवण्यासाठी अर्जुन सज्ज आहे. अर्जुनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Arjun Tendulkar: येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. या सिझनमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्समध्ये खेळण्याची संधी मिळणार का, असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. गेल्या सिझनमध्ये तब्बल 3 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अर्जुन तेंडुलकरला संधी देण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्याला साजेसा खेळ करण्यात आला नाही. दरम्यान या सिझनपूर्वी अर्जुन जोमाने प्रॅक्टिस करताना दिसतोय.
अर्जुनच्या गोलंदाजीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
आयपीएलच्या 16 व्या सिझनमध्ये अर्जुन तेंडुलकरला म्हणावं तसं संधीचं सोनं करता आलं नाही. मात्र येत्या सिझनमध्ये आपल्या खेळाची जादू दाखवण्यासाठी अर्जुन सज्ज आहे. अर्जुनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये अर्जुन नेट्समध्ये उत्तम गोलंदाजी करताना दिसतोय. अर्जुन एक बॉल इतका उत्तम टाकतो की, समोर असलेला गोलंदाज जमिनीवर पडल्याचंही या व्हिडीओमध्ये दिसतंय.
यंदाच्या आयपीएलसाठी तयार आहे अर्जुन
मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुन एकामागून एक उत्कृष्ट बॉल टाकताना दिसतोय. व्हिडिओमध्ये अर्जुनच्या हातातून बाहेर पडलेला एक बॉल थेट फलंदाजाच्या पायाकडे जातो.
यावेळी फलंदाज कसा तरी त्याची बॉल मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र शॉट खेळताच तो जमिनीवर पडतो. अर्जुन परफेक्ट यॉर्कर लेन्थचा दुसरा आणि तिसरा बॉलही टाकतो, ज्यावर फलंदाजाला बॅटही मारता येत नाही. अर्जुनच्या गोलंदाजीतही जबरदस्त वेग दिसून येतोय. त्यामुळे यंदाच्या आयपीएलसाठी अर्जुन तेंडुलकर चांगलीच प्रॅक्टिस करत असल्याचं म्हटलं जातंय.
कसं आहे अर्जुनची आयपीएलमधील कामगिरी
अर्जुन तेंडुलकरने गेल्या सिझनमध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून चार सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी अर्जुन तेंडुलकरने IPL 2023 मध्ये बॅटने फक्त 13 रन्स केले होते. तर गोलंदाजीमध्ये त्याने 3 विकेट घेतल्या होत्या.
पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स गुजरातशी भिडणार
मुंबई इंडियन्स आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. दोन्ही टीम्समधील हा सामना 24 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा दुसरा सामना 27 मार्चला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. मुंबईच्या पहिल्या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहतायत.