Arshdeep Singh : टीम इंडियाचा ( Team India ) वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने ( Arshdeep Singh ) आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केली. तर त्याच्या या खेळाची जादू आता इंग्लंडमध्येही दिसून येतेय. अर्शदीप सिंह सध्या इंग्लंडमध्ये असून तो केंट टीमकडून काउंटी क्रिकेट खेळतोय. त्याचा काऊंटीमधील खेळ पाहता अर्शदीपची निवड एशिया कप 2023 ( Asia Cup 2023 ) आणि वर्ल्ड कप 2023 साठी होऊ शकते. 


काऊंटीमध्ये अर्शदीपची उत्तम गोलंदाजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह ( Arshdeep Singh ) सध्या इंग्लंडमध्ये आहे. गोलंदाजीमध्ये अधिक लय मिळविण्यासाठी तो काउंटी क्रिकेट खेळतोय. अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh ) इंग्लंडमध्ये सध्या केंट टीमकडून खेळतोय. यावेळी त्याने सरेविरुद्ध 14.2 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स घेत शानदार गोलंदाजी केली. अर्शदीप सिंहने ( Arshdeep Singh ) काऊंटी क्रिकेटमध्ये जो उत्तम खेळ दाखवलाय त्यामुळे त्याचं खूप कौतुक होताना दिसतंय. 


डेब्यू करताच उत्तम खेळी


अर्शदीप सिंहने ( Arshdeep Singh ) डेब्यू सामन्यामध्येच ही कामगिरी केलीये. त्यामुळे त्याच्या खेळाचं कौतुक होतंय. अर्शदीप सिंहने ( Arshdeep Singh ) 2022 च्या वर्ल्डकपमध्ये बाबर आझमला ज्या प्रकारे बाद केलं होतं, याच पद्धतीने अर्शदीपने ( Arshdeep Singh ) काऊंटीमध्येही डेब्यू केलाय. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. काऊंटीमध्ये बेन फोक्स अर्शदीपचा पहिला शिकार बनला आहे.


कसं आहे अर्शदीपचं करियर


टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह ( Arshdeep Singh ) सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र, टी-20 सिरीजसाठी त्याची निवड होऊ शकते. टीम इंडियामध्ये कमबॅक करण्यासाठी अर्शदीप ( Arshdeep Singh ) कठोर मेहनत घेताना दिसतोय. अर्शदीप सिंगची आंतरराष्ट्रीय कारकिर्द पाहिली तर त्याने टीम इंडियासाठी 26 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 17.78 च्या सरासरीने 41 विकेट्स घेतल्यात. तर वनडेमध्ये त्याला फक्त 3 सामने खेळण्याची संधी मिळाली असून विकेट्सच्या बाबतीत त्याची पाटी कोरी आहे.