नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी आपल्या नेतृत्वासोबच खास विकेटकीपिंगसाठीही प्रसिद्ध आहे. विकेटकीपिंगमध्ये त्याचे स्वत:चे खास असे सायन्स आहे. त्याच्यावर खरोखरच जर संशोधन झाले तर, चकीत करणाऱ्या अनेक गोष्टी पुढे येऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे का,विकेटकीपिंगसाठी धोनी अजिबात सराव करत नाही.


विकेटकीपिंग सर्वाधिक किचकट आणि जबाबदारीचे काम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट हा सांघीक खेळ. त्यामुळे जय पराजयाची जबाबदारी कोणा एकावर न राहता सर्वांचीच. त्यामुळे प्रत्येकाचे मैदानावरील काम हे जबाबदारीचेच. पण, सर्वात किचकट आणि तितकेच जबाबदारीचे काम ठरते ते म्हणजे विकेटकीपिंगचे. कारण ही जबाबदारी पार पाडताना प्रचंड एकाग्रता लागते. तसेच, नजरही तिक्ष्ण असावी लागते. तितकेच धाडस आणि चपळताही असावी लागते. प्रचंड वेगाने येणार चेंडू शरीरावर आदळण्याची शक्यता असल्यामुळे जोखीम पत्करण्याची तयारीही असावी लागते. सोबत शरीराची तंदुरूस्तीही तितकीच महत्त्वाची.


धोनी सर्वच बाबतीत चपकल


वरील सर्व मुद्द्यांचा विचार करता धोनी त्यात अगदी चपकल बसतो. कारण तंदुरूस्तीच्या कारणामुळे धोनी खूपच कमी वेळा मैदानाबाहेर राहिला आहे. विकेटकीपिंगच नव्हे तर, नेतृत्व, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण असा सर्वच गोष्टींमध्ये त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. भारतीय संघात कितीतरी विकेटकीपर्सनी चांगली कामगीरी केली आहे. मात्र, सध्या स्थितीला धोनीला पर्याय नाही. एकदिसीय सामना असो की टी-२०. धोनीच्या हातात विकेटकीपिंग आहे, म्हणजे ती जबाबदारी चोख पार पडणारच.


फलंदाजावर जोरदार दबाव, जगभरात चाहते


धोनीची कामगिरी इतकी जबरदस्त की, पिचवर खेळणाऱ्या फलंदाजाला गोलांदाजाईतकीच भीती धोनीच्या विकेटकीपिंगची वाटते. धोनीच्या विकेटकीपिंगचे खास असे वैशिष्ट्या आहे. त्याला धोनी सायन्स असेही म्हटले जाते. धोनीच्या स्टंपिंगचे तर केवळ भारतच नव्हे तर, जगभरात फॅन आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा विकेटकीपिंगचा विषय चर्चिला जातो तेव्हा, धोनीचे नाव त्यावर अग्रक्रमाने येतेच येते. आजघडीला धोनीच्या विकेटकीपिंगचा विचार करता इतर संघातले विकेटकीपर त्याच्या आसपासही फिरकत नाहीत.


विकेटकीपर धोनीची कामगिरी


धोनीच्या जबरस्त आणि हटके स्टाईल विकेटकीपिंगचे ७७१ फलंदाज बळी ठरले आहेत. धोनीने ३१६ एकदिवसीय सामन्यात १९५ झेल पकडले आहेत. तर १०६ स्टंपींग केले आहेत. या कामगिरीत जागतिक पातळीवर तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत मार्क बाऊचर (९९८), अॅडम गिलख्रिस्ट (९०५) आणि धोनी अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 


धोनीच्या विकेटकीपिंगवर संशोधनाची गरज


क्रिकेट विश्वाचे अनेक अभ्यासक आणि प्रशिक्षकही सांगतात की धोनीच्या विकेटकीपिंगचे त्याचे स्वत:चे असे खास वैशिष्ट्य आहे. त्याला धोनी सायन्सही म्हणता येऊ शकते. त्याच्या या खास वैशिष्ट्यावर संशोधन करणे गरजेचे आहे. संशोधनांती काही अनेक गोष्टी समोर येऊ शकतात. विशेष असे की, धोनी विकेटकीपिंगसाठी विशेष असा काहीच सराव करत नाही.