मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी फिरोजशाह कोटला मैदानात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यानंतर आशिष नेहराने क्रिकेटला अलविदा केला. आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर त्याने आत्मविश्वासाने संवाद साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळानुरुप क्रिकेट बदलले


नेहराने १९९९मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेट संघाचा जेवढा दबदबा होता तेवढा दबदबा आधी नव्हता. या बदलाबाबत नेहरा म्हणाला, क्रिकेट हा असा खेळ आहे जो दर आठ ते १० वर्षांनी बदलतो. जेव्हा मी खेळण्यास सुरुवात केली तेव्हा २००१ ते २००७-०८दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाला हरवणे कठीण असायचे. आता श्रीलंका, वेस्ट इंडिजचे संघ पूर्वीसारखे राहिले नाहीत.


भुवनेश्वरने निवृत्ती घेण्यास भाग पाडले


आशिष नेहरा आणि भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये एकाच सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळत होते. आयपीएलमधील भुवीच्या शानदार कामगिरीमुळेच नेहराला संन्यास घ्यावा लागला. दरम्यान नेहराने निवृत्ती घेण्याच्या निर्णयामागे वाढते वय हेही कारण आहे. भुवनेश्वर कुमार गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करतोय. याच कारणामुळे दोन वर्षांपासून त्याने पर्पल कॅपवर आपले वर्चस्व कायम ठेवलेय.