कोलकाता : भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरानं न्यूझीलंडविरुद्धच्या दिल्लीत झालेल्या टी-२०नंतर निवृत्ती घेतली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर नेहरा आता काय करणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवृत्तीच्या मॅचमध्ये नेहरानं पुढच्या वाटचालीबाबत काहीच स्पष्ट केलं नव्हतं. भविष्याबाबत विचारलं असता, मी सध्या फक्त आत्ताचाच विचार करतोय. भविष्याबाबत अजून कोणताही विचार केला नसल्याचं नेहरा म्हणाला होता. 


आता मात्र नेहरा त्याच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. आशिष नेहरा आता कॉमेंट्री करताना दिसणार आहे. १६ नोव्हेंबरला सुरु होणाऱ्या भारत-श्रीलंका टेस्टपासून नेहरा कॉमेंट्री करताना दिसेल. वीरेंद्र सेहवागनं ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. 



शेवटची मॅच खेळताना सेहवागनं आशिष नेहराला भविष्याविषयी प्रश्न विचारला होता. येत्या काळामध्ये तुला माझ्याबरोबर कॉमेंट्री करावी लागणार आहे. याशिवाय तुझा दुसरा काय प्लान आहे? असा सवाल सेहवागनं विचारला होता. याबाबत मी अजून विचार केलेला नाही. भविष्यात कोचिंग किंवा कॉमेंट्री करीन. क्रिकेटनं एवढं दिलं आहे आता क्रिकेटला परत द्यायची वेळ आली आहे, असं उत्तर नेहरानं सेहवागला दिलं होतं. 


पाहा काय म्हणाला होता नेहरा