अॅडलेड : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अ‍ॅश्टन एगरने (Ashton Agar) आज इंग्लंडविरूद्दच्या (England) सामन्यात उत्कृष्ट फिल्डींगचे दर्शन घडवले आहे. त्याने बॉऊन्ड्री लाईनवर एक उत्कृष्ट सिक्स वाचवला आहे. या त्याच्या फिल्डींगची प्रतिस्पर्धी खेळाडूच्या बॅटींगपेक्षा जास्त चर्चा रंगली होती.  संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : IND vs NZ यांच्यातील पहिला T20 सामना मोफत पाहता येणार, कसे ते जाणून घ्या 


टी20 वर्ल्ड कपनंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन (Australia Vs England) संघात पहिला वनडे सामना खेळवला जात आहे. या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू अ‍ॅश्टन अगरच्या (Ashton Agar) फिल्डींगचे सर्वत्र कौतूक होत आहे.अ‍ॅश्टनने बाऊंड्री लाईन पार करणारा सिक्स रोखून दाखवला आहे. या त्याच्या अप्रतिम फिल्डींगची चर्चा आहे. 


हे ही वाचा : शुभमन गिल मैदानात उतरताच करणार 'हा' मोठा रेकॉर्ड, जाणून घ्या 


व्हिडिओत काय ? 


इंग्लंडच्या डावाच्या 45व्या ओव्हरमध्ये डेव्हिड मलानचा (Dawid Malan) बाऊंड्री लाईन पार करणारा सिक्स अ‍ॅश्टन अगरने (Ashton Agar) अप्रतिमरित्या ऱोखलाय. पॅट कमिन्सच्या शॉर्ट बॉलवर मलानने अप्रतिम पुल शॉट खेळला होता, हा बॉल थेट बाऊंड्री लाईन पार करेल असे वाटत असताना, स्क्वेअर लेग बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या अ‍ॅश्टन अगरने (Ashton Agar) हवेत उडी मारून बॉल पकडला आणि तो बाऊंड्रीच्या आत टाकला. एगरच्या फिल्डींगमुळे त्याने 5 धावा रोखल्या आहेत, तर इंग्लंडला फक्त एकच धाव काढता आली. 



बॉलिंग चालली नाही, पण फिल्डींगमध्ये कमाल


दरम्यान याआधी अ‍ॅश्टन एगरने (Ashton Agar) लियाम डॉसनला रन आऊट केले होते. अ‍ॅश्टन एगरने एका हाताने बॉल पकडला आणि तो लगेच फेकला आणि डॉसनने एक धाव चोरण्यात बाद झाला. एगरने 10 ओव्हरमध्ये 62 धावा दिल्या यात त्याला एकही विकेट काढता आली नाही. परंतु त्याने आपल्या फिल्डींगने जबरदस्त योगदान दिले. 


या सामन्यात डेविड मलानच्या (Dawid Malan) 135 धावांच्या बळावर इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 287 धावा केल्या आहेत.आता ऑस्ट्रेलियासमोर 288 धावांचे आव्हान असणार आहे.