पर्थ : क्रिकेटच्या मैदानात होणाऱ्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमध्येही अशीच घटना घडली आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मार्श वनडे कपमध्ये साऊथ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये एश्टन अगरच्या नाकाला बॉल लागला. आपल्या भावाचा कॅच पकडत असतानाच डावखुरा स्पिनर अगरला दुखापत झाली. या दुखापतीमुळे एश्टन अगरला मैदानाबाहेर जावं लागलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रविवारी मार्श वनडे स्पर्धेत वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये सामना झाला. या मॅचमध्ये साऊथ ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या एश्टन अगरचा भाऊ वेस अगरने हवेत बॉल मारला. हा बॉल पकडण्यासाठी एश्टन अगर पळाला, पण कॅच पकडताना एश्टनच्या हातातून बॉल सटकला आणि त्याच्या नाकातून रक्त यायला लागलं.



भावाला दुखापत झाल्यानंतर वेस अगर लगेचच एश्टनजवळ पोहोचला आणि त्याची विचारपूस केली. तर बॉलिंग करणाऱ्या जाएल रिचर्डसनने लगेच वैद्यकीय टीमला इशारा करुन मैदानात बोलावलं. कॅच पकडताना एश्टनच्या हातातून बॉल सटकून त्याच्या चष्म्याला लागला आणि चष्मा तुटला.