नवी दिल्ली : टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने सामन्याआधी खेळाडूंना काही टीप्स दिल्या आहेत. रहाणेला विश्वास आहे की, टेस्ट सीरिजमध्ये सिनीअर स्पिनर आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी जर त्यांच्या शैलीत पिचनुसार खेळात बदल केला तर यश मिळेल. 


काय म्हणाला रहाणे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रहाणे एका वृत्तावाहिनीसोबत बोलताना म्हणाला की, ‘मला असं वाटतं की, अश्विन आणि जडेजा दोघेही केवळ भारतातच नाहीतर परदेशातही चांगलं प्रदर्शन करतात. भारतात एका खास अंदाजात गोलंदाजी करावी लागते. जर आपण मोईन अली, नाथन लिओन सारख्या स्पिनर्सना पाहिलं तर त्यांना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये वेगळ्या शैलीत गोलंदाजी करावी लागते’.


खेळात बदल


तो पुढे म्हणाला की, ‘अश्विन आणि जडेजा चांगलं प्रदर्शन करत आहे आणि मला विश्वास आहे की, ते परदेशातही चांगलं खेळतील. त्यांना त्यांच्या शैलीत जरा बदल करावा लागेल. पण मला असं वाटतं की, दोघेही चांगले खेळले तर परदेशात चांगलं प्रदर्शन होईल’.


रवि शास्त्री - विरातचं कौतुक


रवि शास्त्री आणि विराट कोहली यांचं कौतुक करताना तो म्हणाला की, ‘टीममध्ये रवि भाई असल्याने आपण सकारात्मक विचार करतो. ते नेहमी स्वत:वर विश्वास ठेवण्यास आणि आपल्या खेळाची मजा घेण्यासाठी सांगतात. जो चांगलं प्रदर्शन करत नाहीये त्यालाही ते विश्वास देतात. विराटही प्रत्येकासोबत उभा असतो’.