आयपीएलनंतर अश्विनकडे आणखी एक मोठी जबाबदारी
भारताच्या वनडे टीममधून बाहेर असलेला रविचंद्रन अश्विनकडे देवधर ट्रॉफीसाठी भारत अ संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलेय.
मुंबई : भारताच्या वनडे टीममधून बाहेर असलेला रविचंद्रन अश्विनकडे देवधर ट्रॉफीसाठी भारत अ संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलेय.
धरमशालामध्ये 4 ते 8 मार्चदरम्यान ही स्पर्धा होणार आहे. श्रेयस अय्यर भारत ब संघाचे नेतृत्व करणार आहे. अंडर 19 वर्ल्डकप विजेता संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांचीही भारत अ संघात निवड करण्यात आलीये.
निवड समितीने नागपूरमध्ये रणजी चॅम्पियन विदर्भविरुद्ध 14 ते 18 मार्चदरम्यान होणाऱ्या इराणी कपसाठी शेष भारत संघाची जबाबदारी करुण नायरकडे सोपवण्यात आलीये.
नुकतीच आयपीएलच्या 11व्या सीझनसाठी 7.60 कोटी रुपये खर्चून किंग्ज इलेव्हन पंजाबने अश्विनला खरेदी केले. अश्विनला किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार बनवण्यात आलेय. त्यामुळे ही मोठी जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आलीये.
अश्विनने जुलै 2017मध्ये भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. पंजाबचे कर्णधार सोपवल्यानंतर अश्विन म्हणाला, ज्याप्रमाणे मी दरवर्षी आयपीएलमध्ये खेळतो त्याच मानसिकतेने यंदाही खेळणार आहे. या सत्रात माझ्यावर मोठी जबाबदारी आहे आणि मी या आव्हानासाठी सज्ज आहे. मी इतर कोणत्याही गोष्टीवर लक्ष देत नाहीये. जे व्हायचे असेल ते होणारच.
भारत अ : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), पृथ्वी शॉ, उन्मुक्त चंद, अक्षदीप नाथ, शुभमान गिल, रिकी भुई, सूर्यकुमार यादव, इशान किशन (विकेटकीपर), कृणाल पंड्या, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, बासिल थम्पी, कुलवंत खेजरोलिया, रोहित रायुडू.
भारत ब: श्रेयस अय्यर (कर्णधार), रुतुराज गायकवाड़, अभिमन्यू ईश्वरन, अंकित बावने, मनोज तिवारी, सिद्धेष लाड, कोना भरत (विकेटकीपर), जयंत यादव, धर्मेंद्र सिंह जडेजा, हनुमा विहारी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, हर्षल पटेल, उमेश यादव, रजत पाटीदार.