अश्विनच्या या गोष्टीमुळे लाजली प्रिती
प्रीती लाजली आणि लपवला आपला चेहरा
मोहाली : मोहालीच्या क्रिकेट मैदानावर रविवार पंजाब आणि चेन्नई यांच्यामध्ये सामना रंगला. आर. अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबने विजय मिळवला. पंजाबने चेन्नईचा ४ रनने पराभव केला. या मॅचमध्ये आर. अश्विनने ११ बॉलमध्ये १४ रन बनवले. पण या छोट्याशा खेळीनंतर अश्विनची पत्नी प्रीती लाजली आणि तिने आपला चेहरा लपवला.
काय झालं होतं
पंजाबची इनिंग १९ व्या ओव्हरपर्यंत पोहोचली. शार्दुल ठाकुरच्या या ओव्हरमध्ये आर. अश्विन पुल करण्याच्या प्रयत्नात धोनीच्या हातात कॅच देऊन बसला. अश्विन आऊट होताच कॅमरा त्याची पत्नी प्रीतीकडे गेला. कॅमेरा आपल्याकडे आल्याचं पाहाताच ती लाजली आणि तिने आपला चेहरा लपवला. याआधी अश्विनने डीप फाइन लेगवर एक सिक्स देखील मारला. या सामन्यामध्ये पंजाबकडून गेलने तुफानी अर्धशतक ठोकलं. चेन्नईकडून धोनीने ४४ बॉलमध्ये ७९ रन केले. या सामन्यात चेन्नईचा ४ रनने पराभव झाला.