अश्विनचं इंग्लंड विरुद्ध शानदार शतक, बनवला हा रेकॉर्ड
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत चार सामन्यांची टेस्ट सीरीज सुरु आहे.
Ind vs Eng 2nd Test LIVE: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत चार सामन्यांची टेस्ट सीरीज सुरु आहे. चेन्नईच्या चेपक स्टेडियममध्ये सुरु असलेल्या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. भारताकडून आर. अश्विनने शानदार शतक ठोकलं आहे. बातमी लिहिण्यापर्यंत अश्विनने 133 बॉलमध्ये त्याने 103 रन केले आहेत. अश्विनने महत्त्वाच्या क्षणी ही कामगिरी केली आहे.
चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या आर अश्विनने दुसऱ्या डावात फलंदाजीसह शानदार शतक झळकावले. अश्विनने कसोटी कारकीर्दीत पाचव्यांदा शतक ठोकले. या शतकी खेळीमुळे आर अश्विननेही एक मोठी कामगिरी बजावली.
अश्विन हा आशियातील पहिला क्रिकेटपटू आहे ज्याने शतकीय खेळीसह डावात पाच विकेट घेतले आहेत. इयान बोथमने 5 वेळा हा पराक्रम केला आहे. त्याचवेळी, साकिब अल हसन, गॅरी सोबर्स, मुश्ताक मोहम्मद, जॅक कॅलिस यांनी 2-2 वेळा हे कामगिरी केली आहे. अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध याआधीचे चारही शतकं ठोकले आहेत. पाचवं शतक त्याने इंग्लंड विरुद्ध ठोकलं आहे.
पहिल्या दिवसापासून चेन्नईच्या खेळपट्टीवर इंग्लंडचे अनेक माजी खेळाडू प्रश्न उपस्थित करत होते. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना पहिल्या दिवसापासून मदत करीत होती. जेव्हा पहिल्या डावात इंग्लंडचा डाव 134 धावांवर आटोपला होता तेव्हा त्यांच्या आधीच्या खेळाडूंनी खेळपट्टीवर दोष देणे सुरू केले होते पण दुसऱ्या डावात आर अश्विनने ज्या प्रकारे शतक झळकावले. त्यानंतर सगळ्यांनाच त्याने उत्तर दिलं आहे.
भारताने 54/1 पासून आज सुरुवात करत 80 ओव्हरमध्ये 9 विकेट गमवत 247 रन केले होते. आर अश्विन आणि मोहम्मद सिराज हे क्रीजवर आहेत. रोहित शर्माने 26, शुभमन गिलने 14, पुजाराने 7, कोहली 62, पंतने 8, रहाणेने 10, अक्षर पटेलने 7, कुलदीप यादवने 3, इशांत शर्माने 7 रन केले आहेत. भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये 9 विकेट गमवत 284 रन केले आहेत.
भारताकडे आता 479 रनची लीड आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताने 329 रन केसे होते. ज्यामध्ये रोहित शर्माने 161 रनची शानदार खेळी केली होती.