ढाका : आशिया चषक स्पर्धेच्या फायनल मॅचमध्ये भारताने मलेशियावर मात केली आहे. भारतीय हॉकी टीमने मलेशियाचा २-१ ने पराभव करत आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय रोमहर्षक अशा या मॅचमध्ये भारतीय हॉकी टीमने मलेशियाचा २-१ने पराभव केला आहे. या विजयासोबतच भारताने तिसऱ्यांदा आशिया चषक आपल्या नावावर केला आहे.


भारतातर्फे रमनदिप सिंह आणि ललित उपाध्याय यांनी एक-एक गोल केला. त्यानंतर भारतीय टीमने मलेशियावर दबाव कायम ठेवला.



यापूर्वी भारतीय हॉकी टीमने २००३ आणि २००७मध्ये आशिया चषक हॉकी स्पर्धा आपल्या नावावर केली होती. त्यानंतर आता पून्हा एकदा भारतीय टीमने आशिया चषक हॉकीवर आपलं नाव कोरलं आहे.


भारतीय टीमने दोन्ही गोल सुरुवातीच्या दोन सत्रातच केले. मॅचच्या पहिल्या सत्रातील तिसऱ्याच मिनिटाला रमनदिप सिंह याने गोल करत आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात ललित उपाध्यायने दुसरा गोल केला. त्यामुळे मलेशियाच्या टीमवर चांगलाच दबाव वाढला होता. मलेशियाकडून शाहरिल सबाह याने एक गोल केला.