मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये मागच्या ३ वर्षांमध्ये फक्त ३ मॅच खेळवण्यात आल्या आहेत. पण या महिन्यामध्ये १० दिवसांमध्येच या दोन्ही टीम ३ वेळा एकमेकांविरुद्ध खेळू शकतात. आशिया कपला युएईमध्ये १५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. यामध्ये भारत-पाकिस्तानचा सामना १९ सप्टेंबरला होणार आहे.


स्पर्धेत ६ टीम, भारत-पाकिस्तान एका ग्रुपमध्ये 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कपमध्ये एकूण ६ टीम सहभागी होणार आहेत. भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग हे देश ग्रुप एमध्ये तर बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान ग्रुप बीमध्ये आहेत. १४ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची फायनल २८ सप्टेंबरला होणार आहे. 


प्रत्येक ग्रुपच्या २-२ टीम सुपर-४मध्ये 


ग्रुप ए आणि ग्रुप बीच्या २-२ टीम सुपर-४मध्ये जाणार आहेत. सुपर-४मध्ये गेलेल्या चारही टीम एकमेकांविरुद्ध खेळतील. सुपर-४मधल्या टॉप २ टीम फायनलमध्ये खेळतील. 


२३ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान दुसऱ्यांदा खेळणार?


ग्रुप एमध्ये भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग एका ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपमध्ये जर मोठा उलटफेर झाला नाही तर पुढच्या राऊंडमध्ये भारत आणि पाकिस्तानची टीम प्रवेश करेल. असं झालं तर २३ सप्टेंबरला पुन्हा भारत-पाकिस्तानमध्ये मॅच होईल. या दोन्ही टीमला पुन्हा एकदा एकमेकांशी भिडण्याची संधी मिळेल. यासाठी दोन्ही टीमना फायनल गाठावी लागेल. २८ सप्टेंबरला फायनल खेळवण्यात येणार आहे. 


भारत १२९ पैकी ५२ मॅच जिंकला


भारत आणि पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत १२९ वनडे मॅच झाल्या आहेत. यामध्ये भारतानं ५२ मॅच जिंकल्या तर ७३ मॅचमध्ये पराभव झाला. ४ मॅचचा कोणताही निर्णय लागला नाही. 


आशिया कपचं संपूर्ण वेळापत्रक


१५ सप्टेंबर : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (दुबई)


१६ सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर (दुबई)


१७ सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (अबुधाबी)


१८ सप्टेंबर: भारत विरुद्ध क्वालिफायर (दुबई)


१९ सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (दुबई)


२० सप्टेंबर : बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (अबुधाबी)


सुपर फोर:


२१ सप्टेंबर: ग्रुप ए विजेता विरुद्ध ग्रुप बी उपविजेता (दुबई)


ग्रुप बी विजेता विरुद्ध ग्रुप ए उपविजेता (अबूधाबी)


२३ सप्टेंबर: गट अ विजेता विरुद्ध ग्रुप ए उपविजेता (दुबई)


ग्रुप बी विजेता विरुद्ध ग्रुप बी उपविजेता (अबुधाबी)


२५ सप्टेंबर: गट अ विजेता विरुद्ध गट ब विजेता (दुबई)


२६ सप्टेंबर: ग्रुप ए उपविजेता विरुद्ध ग्रुप बी उपविजेता (अबु धाबी)


२८ सप्टेंबर : अंतिम लढत (दुबई)