दुबई : आशिया कप 2018 मध्ये ग्रुप मॅचनंतर सुपर 4 चा रणसंग्राम सुरू होतोय. यात शुक्रवारी भारताचा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममद्ये बांग्लादेशशी होणार आहे. याच दिवशी दुसऱ्या एका सामन्यात पाकिस्तान अफगाणिस्तानला भिडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि बांग्लादेश दरम्यानचा सामना आज भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. भारतीय टीम प्लेइंग इलेव्हनमध्ये कमीत कमी एक बदलासोबत उतरणार आहे. ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टूर्नामेंटच्या बाहेर आहे. त्याच्याऐवजी रवींद्र जडेजा किंवा दीपक चाहरला संधी दिली जाऊ शकते. त्याशिवाय टीममध्ये आणखीन काही बदल होण्याची शक्यता तशी कमीच दिसतेय.


दुसरीकडे, बांग्लादेशचा ओपनर तमीम इक्बालही दुखापतीमुळे टूर्नामेंटच्या बाहेर आहे. भारतासाठी बांग्लादेशी बॉलर्सचा खास करून स्पिनर्सचा सामना करणं सोप्पं नसेल. तेजतर्रार मुस्ताफिजुर रहमान, मेहदी हसन आणि शाकिब अल हसन हे भारतीय बॅटसमनना आव्हानात्मक ठरू शकतात. 


भारताना आशिया कप 2018 च्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये हाँगकाँगला पछाडलं होतं. तसंच टीम इंडियानं आपल्या दुसऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानला सहज मात दिली. बांग्लादेश ग्रुप बीमध्ये एक विजय - एक पराजयासोबत दुसऱ्या क्रमांकावर राहिलं. त्यांनी श्रीलंकेला पछाडलं परंतु, अफगानिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.


अशा असतील टीम्स :


भारत : रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, दीपक चाहर, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, मनीष पांडे, सिद्धार्थ कौल आणि खलील अहमद 


बांग्लादेश : मशरफे मुर्तजा (कॅप्टन), लिटन दास, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, मोहम्मद मिथुन, मोसादिक हुसेन, मेहदी हसन, रूबेल हुसैन, मुस्ताफिजुर रहमान, अबु हैदर, आरिफ हक, मोमिनुल हक, नजमुल हुसैन शन्टो, नजमुल इस्माल