मुंबई : कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात वाईट परिस्थिती आहे. असेच काही वातावरण आता हळूहळू शेजारील देश श्रीलंकेतही दिसू लागले आहे. श्रीलंकेत वाढत्या कोरोना विषाणूमुळे क्रिकेट चाहत्यांसाठी एक बॅडन्यूज समोर आली आहे.


एशिया कप रद्द


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे बुधवारी पाकिस्तानऐवजी श्रीलंकेत होणारा एशिया कप रद्द करण्यात आला. अखेरचा आशिया कप जून 2018 मध्ये होणार होता, परंतु श्रीलंका क्रिकेटचे सीईओ डिसिल्वा यांनी जाहीर केले की त्यांना स्पर्धा आयोजित करणे अवघड आहे.


डीसिल्वा म्हणाले की, "सद्यस्थिती लक्षात घेता ही स्पर्धा जूनमध्ये होणार नाही." असा निर्णय घेण्यात आला आहे.


2023 वर्ल्डकप नंतरच आता ही स्पर्धा होईल. बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या अध्यक्षतेखालील आशियाई क्रिकेट परिषदेने अद्याप याबाबत औपचारिक घोषणा केलेली नाही.


भारतातही कोरोनाचा कहर


कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देश सध्या त्रस्त आहे. आवश्यक औषधे आणि ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे लोक आपला जीव गमावत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाची प्रकरणे कमी झाली असली तरी या साथीच्या आजारामुळे दररोज 3 हजारांहून अधिक लोक आपला जीव गमावत आहेत ही चिंतेची बाब आहे.