Sport News : जगभरातील क्रिकेट चाहत्यांना सुरू होणाऱ्या आशिया चषकाची प्रतीक्षा आहे. रविवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. या सामन्याआधी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये एक्स फॅक्टर ठरणाऱ्या खेळाडूंची नावं घेतली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल आणि ऋषभ पंत, रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या हे एक्स फॅक्टर ठरणारे खेळाडू आहेत. टीम इंडियामध्ये एक्स फॅक्टर ठरणाऱ्या खेळाडूंची काही कमी नाही. तर पाकिस्तानकडे बाबर आझम, मोहम्मद रिझवान  आणि इतर वेगवान गोलंदाजही आहेत. त्यामुळे जो चांगलं प्रदर्शन करेल तो संघ जिंकेल, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे. 


विराट हा मोठा खेळाडू आहे. तो स्वत: धावा काढण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे मी आशा करतो विराट संघासाठी आणि स्वतःसाठी  धावा करण्यात यशस्वी ठरेल, असं म्हणत गांगुलीने विराटच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडण्याची इच्छा व्यक्त केली. 


आशिया चषक स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाचे पारडं नेहमीच जड राहिलं आहे. टीम इंडियाने 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने 5 वेळा ट्रॉफी 5 वेळा जिंकली आहे. पाकिस्तानला दोनदा जिंकण्यात यश आलं आहे. बांगलादेश आणि अफगाणिस्तानने आजपर्यंत एकदाही आशिया कपची ट्रॉफी जिंकलेली नाही.