India vs Pakistan Asia Cup 2022 : आशिया कप 2022 मध्ये (Asia Cup 2022) आता आणखी थरार पहायला मिळणार आहे. सुपर 4 टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात रविवारी 4 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे. टीम इंडियाचा पाकिस्तानला पुन्हा पराभूत करत फायनलमध्ये धडक मारण्याचा मानस असणार आहे. टीम इंडियाने पहिल्या 2 सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि हाँगकाँगचा (Hong Kong) पराभव केला. मात्र यांतर ऑलराउंडर रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. आता पाकिस्तान विरुद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यात स्टार प्लेअर जाडेजाच्या जागी खेळू शकतो. (asia cup 2022 ind vs pak captain rohit sharma may be added ravi bishnoi in team india playing eleven against pakistan match on 4th sepetember)


या खेळाडूला संधी? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे जाडेजाला (Ravindra Jadeja) स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. आता त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये रवि बिश्नोईचा (Ravi Bishnoi) समावेश केला जाऊ शकतो. रविने टी 20 मध्ये आपल्या बॉलिंगच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  


रविने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातच पदार्पण केलंय. रोहितने आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये 20 विकेट्स घेतल्या आहेत. रवि  यांनंतर आशिय कप स्पर्धेत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. 


पाकिस्तान विरुद्ध धमाका? 


आशिया कपचं आयोजन हे यूएईत करण्यात आलंय. दुबईतील खेळपट्ट्या कायम फिरकी गोलंदाजांसाठी मदतशीर ठरल्यात. या खेळपट्ट्यांवर रवि धमाका करु शकतो.  रवि टीम इंडियाला झटपट विकेट्स मिळवून देऊ शकतो. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात रविला संधी मिळाल्यास तो रोहितचा हुकमाचा एक्का ठरु शकतो. 


आशिया कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, युजवेंद्र चहल, आर बिश्नोई, भुवनेश्वर कुमार अर्शदीप सिंह आणि अवेश खान. 


पाकिस्तान संभावित प्लेइंग इलेव्हन : बाबर आजम (कॅप्टन), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फखर जमां, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहबाज.