आशिया कप स्पर्धेत  (Asia Cup 2022) भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला (IND vs PAK) पाच विकेट राखून नमवलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी 20 सामन्यांनंतर हा पहिला सामना झाला. भारताने हा सामना जिंकत गेल्या वर्षी झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करत 147 धावा केल्या. यानंतर भारतीय संघाने 19.4 षटकामध्ये पाच विकेट गमावून सामना जिंकला. या सामन्यामध्ये हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) आधी तीन बळी घेत नाबाद 33 धावा करत महत्त्वाची खेळी खेळली.


या सामन्यादरम्यान दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाही उपस्थित होता. या सामन्यात विजय देवरकोंडाने भारतीय फलंदाज विराट कोहली बाद झाल्यानंतर आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली.


पाकिस्तानने भारतासमोर 20 षटकांत 148 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्या अंतर्गत केएल राहुल बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मात्र रोहित शर्मानंतर मोठा फटका खेळून कोहलीही 35 धावा करून बाद झाला. 


जबरदस्त फॉर्ममध्ये दिसणारा कोहली बाद होताच स्टेडियममध्ये शांतता पसरली. विराट बाद झाल्यानंतर विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarakonda) चेहऱ्यावरही निराशा स्पष्ट दिसत होती. विजय देवरकोंडाची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.



व्हायरल ट्विटमध्ये विराट कोहली पॅव्हेलियनकडे जात असताना विजय देवरकोंडाचा चेहरा पडलेला दिसला. मात्र त्यानंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने जोरदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर विजय देवरकोंडाच्या चेहऱ्यावरील हास्य परतलं.