Asia Cup 2022: आशिया कप स्पर्धेतील साखळी सामन्यातील दोन सामने जिंकल्यानंतर सुपर 4 फेरीत पाकिस्ताननं भारताला पराभवाची धूळ चारली. भारताने पाकिस्तानसमोर 181 धावा करत विजयासाठी 182 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र पाकिस्ताने पाच गडी गमवून 19 षटकं आणि 5 चेंडूत दिलेलं लक्ष्य गाठलं. पाकिस्ताननं 5 गडी आणि 1 चेंडू राखून विजय मिळवला. पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या.  रोहित म्हणाला की, "हा खूप दबावपूर्ण सामना होता आणि संघाने शेवटपर्यंत संयम राखला." 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मला वाटतं ही एक चांगली धावसंख्या होती. कोणतीही खेळपट्टी, कोणत्याही परिस्थितीत 181 धावा खूप आहेत. पण आम्ही मधल्या षटकात विकेट्स घेऊ शकतो नाही. सामना आमच्या हातून निसटत गेला. आज आम्हाला खूप काही शिकायलं मिळालं." असं कर्णधार रोहित शर्माने सांगितलं. "खेळाडूंनी चांगले आव्हान दिले आणि आम्ही शेवटपर्यंत सामन्यात होतो. संघाच्या कामगिरीवर मी खूश आहे.", असंही रोहित शर्माने पुढे सांगितलं. 


रोहित शर्माने या विजयाचं श्रेय पाकिस्तानला देत सांगितलं की, "त्यांनी भारतापेक्षा चांगली कामगिरी केली." सुपर-4 मध्ये प्रत्येक संघाला 3 सामने खेळायचे आहेत. 4 पैकी टॉप 2 संघ अंतिम फेरीत जातील. भारताला 6 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आणि 8 सप्टेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. दुबईत 11 सप्टेंबरला विजेतेपदाचा सामना रंगणार आहे.