Asia Cup 2022: क्रिकेटप्रेमींना आता उत्सुकता लागली आहे ती एशिया कप स्पर्धेची. 27 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना असणार आहे अर्थात भारत आणि पाकिस्तानदरम्यान (India vs Pakistan). टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी रोहित सेना सज्ज झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडिया कोणत्या 11 खेळाडूंबरोबर मैदानात उतरणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. जाणून घेऊया कशी असू शकते भारताची प्लेईंग 11.


भारताची सलामीची जोडी
पाकिस्तानविरुद्ध सलामीच्या जोडीसाठी मदार असणार आहे ती कर्णधार रोहित शर्मा (ROHIT SHARMA) आणि केएल राहुलवर (KL RAHUL). याआधी टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित आणि राहुलनेच ओपनिंग केली होती. पण दोघंही फार काळ मैदानावर टीकू शकले नव्हते. आता रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात आहे. त्याचा भारतीय संघाला फायदा होऊ शकतो.


मिडल ऑर्डर
फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli) मैदानात उतरु शकतो. गेल्या काही सामन्यात विराट कोहलीला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पण पाकिस्तानविरुद्ध त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. या सामन्यात त्याला सूर सापडला तर पाकिस्तान गोलंदाजांवर तो भारी पडू शकतो. 


यानंतर चौथ्या क्रमांकावर असेल सध्या टॉप फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). गेल्या काही सामन्यात सूर्यकुमार यादवने आपला दबदबा निर्माण केला आहे. पाचव्या क्रमांकावर विकेटकिपर आणि फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Panta). ऋषभ पंत धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो.


या ऑलराऊंड खेळाडूंचा समावेश
भारतीय संघात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या दोन ऑलराऊंडर खेळाडूंना संधी मिळू शकते. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देणारा हार्दिक पांड्या सध्या जबरदस्त फॉर्मात आहे.


या गोलंदाजांना मिळू शकते संधी
गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) संधी मिळू शकते. भुवनेश्वर कुमार संघात एकमेव अनुभवी गोलंदाज आहे. याशिवाय अर्शदीप सिंग आणि आवेश खानचा समावेश होऊ शकतो. स्पीन गोलंदाज म्हणून यजुवेंद्र चहलला पहिली पंसती मिळू शकते.