Asia Cup 2022 :  आशिया कपमधून टीम इंडिया बाहेर पडली असून आज भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. आजच्या सामन्यामध्ये भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. आशिया कपमध्ये प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडियाला आज लाज राखण्यासाठी अफगाणिस्तानला पराभूत करावं लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि हाँगकाँग दोन संघांवर मात करत धमाकेदार सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर भारताला पाकिस्तान आणि श्रीलंका संघाने पराभूत केलं. त्यामुळे आशिया कपमधून भारतीय संघ बाहेर झाला आहे. रोहित शर्माने अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये संघात बदल केले आहेत.  के. एल. राहुलला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.


हार्दिक पांड्या आणि रवि बिश्नोई आणि स्वत: रोहित बाहेर बसत दिनेश कार्तिक, दीपक चहर, अक्षर पटेल आणि रविचंद्रन आश्विन यांना आज संधी देण्यात आली आहे. आजच्या सामन्यामध्ये संघाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.



अफगाणिस्तानविरूद्ध भारतीय संघ : केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.