India vs Pakistan : मनाने भारतीय, पण बायको पाकिस्तानी, सपोर्ट कोणाला करावा, इंडिया की पाक? क्रिकेट चाहत्याचा फोटो व्हायरल
तुम्हाला काय वाटतं आगामी सामन्यात या चाहत्याने कोणाला सपोर्ट करायला हवा, पाकिस्तान की इंडिया?
दुबई : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) रविवारी रंगलेल्या हाय व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने (team india) 5 विकेट आणि दोन बॉल राखत पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने टी20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. या विजयाचा शिल्पकार टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्या (Hardik pandya) ठरला होता. टीम इंडियाच्या विजयानंतर आता सामन्या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आला. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे.
पाकिस्तान विरूद्ध सामन्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये खासकरून हार्दिकची (Hardik pandya) शेवटच्या क्षणातील फटकेबाजीचे फोटो आणि विनिंग सिक्सचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. काही फोटो तर हार्दिकने बॉल डॉट केल्याचेही आले आहेत. ज्यामध्ये तो निराश दिसतोय. तसेच दिनेश कार्तिकने (Dinesh kartik) हार्दिकच्या विनिंग शॉटनंतर त्यांच अनोख्या पद्धतीत केलेल्या अभिनंदनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या सर्व खेळाडूंच्या या गोष्टी व्हायरल होत असतानाचा एका क्रिकेट फॅन्सचा देखील फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे नेमकं या फॅन्सने असं काय केलंय, जेणेकरून त्याचा फोटो व्हायरल होत आहे? असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल, त्यामुळे जाणून घेऊयात.
फोटोत काय?
भारत-पाकिस्तानमधला हा हायव्होल्टेज सामना पाहण्यासाठी स्टेडीयम भरगच्च भरले होते. हा सामना पाहण्यासाठी एक क्रिकेट फॅन आला होता. हा क्रिकेट फॅन एकटा नव्हे तर त्याच्यासोबत तो बायकोलाही घेऊन आला होता. या फॅनने खेळाडूंना चिअर करणार एक बोर्ड सुद्धा आणला होता. या बोर्डवर त्याने 'दिल है हिंदुस्तानी लेकीन बिवी पाकिस्तानी' असा मजकूर लिहला होता. या मजकूर पाहून तुम्हाला कळालंच असेल, हा क्रिकेट फॅन भारतीय आहे, तर त्याची बायको पाकिस्तानी आहे. त्यामुळे त्याने अशाप्रकारे हटके मजकून लिहून खेळाडूंना सपोर्ट केला होता.
विशेष म्हणजे बायको पाकिस्तानी असल्याने आणि तो भारतीय असल्याने नेमकं कोणत्या संघाला संपोर्ट करावा असा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्यामुळे त्याने शक्कल लढवत बायकोलाही वाईट वाटणार नाही यासाठी चिअर्स बोर्डवर हटके मजकूर लिहून आपआपल्या टीमला सपोर्ट केला. त्यामुळे त्याचा चिअर करतानाचा हा फोटो व्हायरल होत आहे.
दरम्यान टीम इंडियाला शेवटच्या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 6 रन्सची गरज असताना हार्दिक पंड्याने (Hardik pandya) सिक्स मारून विजय मिळवून दिला होता. हार्दिकने बॅटीसह बॉलिंगनेही कमाल केला होता. हार्दिक पंड्याने या सामन्यात गोलंदाजीत 17 बॉलमध्ये 3 विकेट आणि 33 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरलाय.