दुबई : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) रविवारी रंगलेल्या हाय व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने (team india) पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने टी20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. या विजयाचा शिल्पकार टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्या होता.  हार्दिक पंड्याने या सामन्यात गोलंदाजीत 17 बॉलमध्ये 3 विकेट आणि 33 धावांची नाबाद खेळी केली होती. यासोबतचं शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स मारून त्याने टीम इंडियाला (team india)  विजय मिळवून दिला होता. हार्दिक पंड्याने (Hardik pandya) पाकिस्तान विरूद्ध सामन्यात मोलाची भूमिका बजावून सुद्धा दिनेश कार्तिकची (Dinesh kartik)  का चर्चा रंगलीय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दिनेश कार्तिकची नेमकी चर्चा का रंगलीय ती जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानने विजयासाठी भारतासमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. के एल राहूल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने विकेट गमावल्यानंतर पाकिस्तानने मॅचमध्ये वापसी केल्याचे चित्र होते. कारण एका मागून एक खेळाडू पव्हेलियन गाठत होता. या दरम्यान मैदानात उतरलेल्या रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि हार्दिक पंड्याने (Hardik pandya) मोर्चा सांभाळला. पराभवाच्या छायेत असलेल्या टीम इंडियाला विजयाचं स्वप्न दाखवलं. 


दोघांनीही टीचून फलंदाजी करत सामना शेवटपर्यंत नेला. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) एकिकडे ताबडतोब बॅटींग करत होता, तर दुसरीकडे हार्दिक पंड्या संयमी खेळ खेळत होता. मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहोचून सुद्धा निकाल काय लागेल, असा प्रश्न चाहत्यांना सतावत होता. 18 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याने (Hardik pandya) सिक्स आणि फोर मारून सामन्यात वापसीचे संकेत दिले होते. शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला 6 बॉलमध्ये 7 धावांची गरज  होती. यावेळी फॉर्ममध्ये असलेल्या जडेजाचा विकेट पडला.या दरम्यान पुन्हा सामना फिरला आणि पाकिस्तानच्या आशा उंचावल्या. 


रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja)  नंतर अनुभवी दिनेश कार्तिकची (Dinesh kartik) मैदानात एंट्री झाली. त्याने पहिल्याच बॉलवर एक धावा काढून पंड्याला स्ट्राईक दिली. त्यामुळे टीम इंडियाला 3 बॉलमध्ये 6 धावांची गरज होती. यावेळी स्ट्राईकवर असलेल्या हार्दिक पंड्याने सिक्सर लगावून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. 



दिनेश कार्तिकचं प्रकरण काय? 
हार्दिक पंड्याने (Hardik pandya) सिक्स मारताच टीम इंडियाचा विजय झाला. या विजयानंतर दिनेश कार्तिकने हार्दिक पंड्यासमोर मान झूकवून टाळ्या वाजवत त्याचे अभिवादन केले. वयाने व अनुभवाने सिनियर असलेल्या एका खेळाडूने आपल्यापेक्षा लहान खेळाडूला अशी दाद देणे ही मैदानात घडणारी  क्वचितच घटना आहे. तसेच मैदानावर रोज रोज असे क्षण पाहायला मिळत नाही. त्यामुळेचं कार्तिकने मैदानावर दाखवलेल्या खिलाडी वृत्तीचे कौतूक होत आहे. याचसोबत त्याने मैदानावर दाखवलेल्या कृतीचे भारतासह पाकिस्तानचे खेळाडू फॅन झाले आहेत. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.