India Vs Pakistacn Arshdeep Singh Trolled Sachin Tendulkar Says: आशिया कप 2022 स्पर्धेतल्या सुपर 4 फेरीतील पहिल्याच सामन्यात पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं. हा सामना रंगतदार वळणावर असताना 18 व्या षटकात अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) असिफ अलीचा झेल सोडला. त्यानंतर असिफ अलीने 19 षटकात सामन्याचं चित्रच पालटून टाकलं. त्यामुळे सोशल मीडियावर अर्शदीपला ट्रोल करण्यात येत आहे. असं असताना अनेक आजी माजी क्रिकेटपटू अर्शदीपची पाठराखण करत आहे. आता क्रिकेटचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) मैदानात उतरला आहे. सचिन तेंडुलकरने अर्शदीपच्या पाठिंब्यासाठी एक ट्वीट करत सांगितलं आहे की, खेळाडूंवर वैयक्तिक टीका नको.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"देशाचे प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक खेळाडू आपले सर्वोत्तम देतो आणि देशासाठी नेहमीच खेळतो. त्यांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे आणि लक्षात ठेवा की खेळात तुम्ही काही जिंकता आणि काही हरता. क्रिकेट किंवा इतर कोणत्याही खेळात वैयक्तिक टीका करू नका. अर्शदीप सिंह मेहनत करत रहा.." असं ट्वीट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केलं आहे. 



विराट कोहलीने (Virat Kohli) अर्शदीप सिंहचा बचाव केला. प्रचंड दबाव असलेल्या सामन्यात कोणाकडूनही चूक होऊ शकते. अर्शदीप सिंह युवा खेळाडू आहे, हळू हळू यातून तो शिकत जाईल असं विराटने म्हटलंय. तर भारताचा माजी स्पीन गोलंदाज आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंह (Harbhajan Singh) यानेही अर्शदीपचं समर्थन केलं आहे. आकाश चोप्राने (Akash Chopra) तर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या प्रोफाईलवर अर्शदीपचा फोटो ठेवला आहे.दुसरीकडे, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंहने 3.5 षटकं टाकून 27 धावा दिल्या. तर एक गडी बाद करण्यात यश आलं.