Pakistan master plan against India Team: एशिया कप स्पर्धा  (Asia Cup 2022) आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती 28 ऑगस्टला होणाऱ्या भारत - पाकिस्तानदरम्यान (India vs Pakistan) होणाऱ्या हाय व्होल्टाज सामन्याची. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी खास रणनिती आखली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान पाकिस्तानचा मास्टर प्लान (Master Plan) उघड झाला आहे. खास भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानने हा प्लान तयार केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेच (Pakistan Cricket Board) या प्लानचा खुलासा केला आहे. याचे काही व्हिडिओ पीसीबीने (PCB) सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


पाकिस्तानचा मास्टर प्लान
पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज आसिफ अली (Asif Ali) याचा व्हिडिओ पीसीबीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आसिफ अली दररोज 100 ते 150 सिक्स मारण्याचा सराव करतोय. त्यामुळे प्रत्यक्ष सामन्यात कमीत कमी 4 ते 5 सिक्स तो मारू शकतो असा यामागे प्लान आहे. दुसऱ्या व्हिडिओत माजी कर्णधार मोहम्मद युसूफ (Mohammad Yousuf) विकेटकीपर मोहम्मद रिझवानचा (Mohammad Rizwan) सराव घेताना दिसतोय. 


आसिफ अलीचा जोरदार सराव
स्पर्धेविषयी आसिफ अली म्हणतो, मी दररोज 100 ते 150 सिक्स मारण्याचा सराव करतोय, म्हणजे सामन्यात 3 ते 4 सिक्स मारु शकेन. मी ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो त्या स्थानावर प्रत्येक ओव्हरमध्ये 12 ते 14 धावांची गरज असते. रनरेट चांगला ठेवण्याच दबाव या ओव्हरमध्ये असतो. ही गोष्ट लक्षात घेऊनच सरावावर भर दिला जात असल्याचं आसिफ अलीने म्हटलंय.



मोहम्मद रिझवानचा सराव
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद युसूफने मोहम्मद रिझवाला फलंदाजीच्या खास टीप्स दिल्या आहेत. स्टम्पवर येणारा बॉल खेळताना डिफेंन्स करण्याचा सल्ला युसूफने रिझवाला दिला आहे. तसंच स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या बॉलवर मोठे फटके खेळण्याचा सल्लाही त्यांनी रिझवानला दिला आहे.