Asia Cup 2022: आशिया कप 2022 स्पर्धेच्या अंतिम सामना पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन संघात होणार आहे. त्यामुळे आज कोण बाजी मारणार? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. मात्र या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज मोहम्मद रिजनवानने धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानचे खेळाडूंमध्ये आजही एका भारतीय खेळाडूची दहशत कायम आहे. मोहम्मद रिजवान याने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत याबाबत गुपित उघड केलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून क्रिकेटचा देव म्हणून संबोधला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी लहान असताना सचिन तेंडुलकरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळताना पाहून मला भीती वाटायची. मला सचिन तेंडुलकर खूप आवडायचा. मला नेहमी प्रश्न पडायचा की, सचिन जेव्हा पाकिस्तानविरुद्ध धावा करेल तेव्हा सेलिब्रेशन कसं करायचं?", असं मोहम्मद रिजवाननं सांगितलं. 


मोहम्मद रिझवान हा टी 20 क्रिकेटमधील नंबर 1 फलंदाज आहे. आशिया चषक 2022 मध्ये पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. अंतिम सामन्यातही संघाला त्याच्याकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. त्याने अंतिम सामन्यात 50 धावा केल्या तर तो आशिया चषक 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील बनेल. मोहम्मद रिझवानने आतापर्यंत 5 डावात 226 धावा केल्या आहेत.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्ध एकूण 87 सामने खेळले असून 3583 धावा केल्या आहेत. यादरम्यान 23 अर्धशतके आणि 7 शतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 664 सामन्यांमध्ये 48.52 च्या सरासरीने 34357 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 164 अर्धशतके आणि 100 शतके झळकावली. 100 शतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे.