Ind Vs Pak Asia Cup 2022: एशिया कप स्पर्धा सुरु व्हायला आता चार दिवसांचा अवधी उरलाय. क्रिकेट प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत त्या 28 ऑगस्टला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तानदरम्यान (India vs Pakistan) होणाऱ्या हाय व्होल्टाज सामन्यावर. एशिया कप स्पर्धेत 6 संघ सहभागी झाले असून संघ दुबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा संघही (Pakistan Cricket Team) आज दुबईत दाखल झाला. याचे काही फोटो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण या फोटोमध्ये एका खेळाडूला पाहून क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत. कारण या खेळाडूचा पाकिस्तान संघात समावेश नाही. पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे एशिया कप स्पर्धेतून आऊट झाला आहे. पण पीसीबीने शेअर केलेल्या फोटोत पाकिस्तानी खेळाडूंबरोबर शाहीन शाह आफ्रिदीही (shaheen shah afridi) दिसत आहे. 



पीसीबीने (PCB) शेअर केलेल्या फोटोत पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (babar azam), मोहम्मद रिझवानसह इतर खेळाडू दिसत आहेत. यात शाहिन शाह आफ्रिदीचाही समावेश आहे. पाकिस्तानी खेळाडूंबरोबर शाहिनचा फोटो पाहून क्रिकेट चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. 


एका क्रिकेट चाहत्याने लिहिलंय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे संघाचा नवा फोटो नाहीए का? कारण यात शाहिनही दिसत आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलंय, दुखापतग्रस्त असताना शाहिन दुबईत काय करतोय, काही जणांनी शाहिन संघाला सपोर्ट करण्यासाठी आला का? असा प्रश्न विचारलाय.



एशिया कपमध्ये शाहिन आफ्रिदी का नाही?
शाहिन शाह आफ्रिदी पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शाहिन आफ्रिदी दुखापतग्रस्त झाला. त्याच्यावर उपचार सुरु असून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दुखापतीमुळे नेदरलँडविरुद्धच्या वन डे सीरिजमध्ये तो खेळू शकला नव्हता आणि आता एशिया कप स्पर्धेतूनही त्याला बाहेर व्हावं लागलंय. शाहिन आफ्रिदीची कमी पाकिस्तानी संघाला नक्कीच जाणवणार आहे. पाकिस्तान संघाने शाहीन आफ्रिदीच्या जागी मोहम्मद हसनैनचा संघात समावेश केला आहे.


एशिया कप साठी पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रउफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन