मुंबई : आशिया कप 2022 ला आजपासून सुरुवात झाली आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात पहिला सामना दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्य़ाला संध्याकाळी 7.30 वाजता सुरूवात होणार आहे. या सामन्याची अवघे तास उरले असताना आता दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन, पिच रिपोर्ट समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कपमध्ये आज श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या दमदार कामगिरीसाठी ओळखले जातात. या स्पर्धेत श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका आहे तर अफगाणिस्तानचे कर्णधार मोहम्मद नबीकडे आहे. 


पिच रिपोर्ट 
दुबई इंटरनॅशनल स्टेडियम हे चांगले स्कोअरिंग ग्राउंड आहे. या स्टेडीअमवर अनेक मोठ्या स्कोरींगचे सामने पार पडले आहेत. त्यामुळे आशिया कपचा पहिलाच सामना रंजक असेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान या सामन्यात जो प्रथम फलंदाजी घेईल त्याला फायदा होणार आहे. कारण प्रथम फलंदाजी करून त्यांना मोठी धावसंख्या उभारता आहे. तर दुसरी फलंदाजी करताना प्रतिस्पर्ध्याला धावसंख्या गाठण काहीस अवघड जाणार आहे.  


सामना कुठे पाहाल? 
आशिया चषक सामन्याचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर दाखवले जाणार आहेत. स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी वन आणि स्टार स्पोर्ट्स वन हिंदीवर पाहता येणार आहेत. मात्र ज्यांच्याकडे सब्सक्रिप्शन नाही त्यांना फ्री डीसीएच (डीडी फ्री डिश) वरच्या डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर सामना तुम्हाला पाहता येणार आहे. 


संभाव्य संघ : 
श्रीलंका संघ : पाथुम निसांका, गुनाथिलाका, भानुका राजपक्षे, चरित अस्लंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, थेक्षना, चमिका करुणारत्ने, असिथा फर्नांडो आणि जेफ्री वेंडरसे


अफगाणिस्तान संघ : नजीबुल्ला झदरन, हजरतुल्ला जझाई, इब्राहिम झदरन, उस्मान गनी, रहमानउल्ला गुरबाज, मोहम्मद नबी (कर्णधार), रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, नूर अहमद आणि करीम जनात.