Asia Cup 2022 : टीम इंडियाला मोठा झटका, Ravindra Jadeja स्पर्धेतून `आऊट`
आशिया कपदरम्यान (Asia Cup 2022) टीम इंडियाला (Team India) मोठा झटका लागला आहे.
मुंबई : आशिया कपदरम्यान (Asia Cup 2022) टीम इंडियाला (Team India) मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) बाहेर पडलाय. दुखापतीमुळे जाडेजाला एशिया कप स्पर्धेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी एशिया कप स्पर्धा ऐन रंगात असताना हा मोठा झटका समजला जात आहे. तर जाडेजाच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा संघाच समावेश करण्यात आला आहे. बीसीसीायने (Bcci) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (asia cup 2022 team india star allrounder ravindra jadeja ruled out due to injurey axar patel)
जाडेजा दुखापतीमुळे बाहेर
जाडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झालीय. त्यामुळे त्याला उर्वरिक सामन्यांना मुकावं लागणार आहे. जाडेजा सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. टीम इंडियाने आशिया कप 2022 मध्ये आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये जाडेजा मॅच विनर असल्याचं सिद्ध झालं.
या ऑलराउंडरला संधी
जाडेजाऐवजी संघात ऑलराउंडर अक्षर पटेलला (Axar Patel) संधी देण्यात आली आहे. अक्षरने गेल्या काही महिन्यांमध्ये चांगली कामगिरी केलीय. अक्षरचा आशिया कपमध्ये स्टँडबाय समावेश करण्यात आला होता. आता त्याचा मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे.
आशिया कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, युजवेंद्र चहल, आर बिश्नोई, भुवनेश्वर कुमार अर्शदीप सिंह आणि अवेश खान.