Video: `...मला वाटलं करिअर संपलं`, Arshdeep Singh ट्रोल झाल्यानंतर विराट कोहलीचा खुलासा
विराट कोहलीने पत्रकार परिषदेत युवा क्रिकेटर अर्शदीप सिंह याची पाठराखण करत स्वत:चं उदाहरण दिलं आहे.
Asia Cup 2022 India Lost Against Pakistan In Super 4 Stage: आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 पहिल्याच सामन्यात पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं. पाकिस्ताननं 5 गडी राखून भारताला (India Vs Pakistan) नमवलं. मात्र या सामन्यातील पराभवानंतर गोलंदाज अर्शदीप सिंहवर निशाणा साधला जात आहे. पाकिस्तानविरुद्धच्या रोमांचक सामन्यात 18 षटकातील तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने (Arshdeep Singh Trolled) शॉर्ट थर्ड मॅनवर आसिफचा झेल सोडला. यानंतर ट्रोलर्सनी अर्शदीपवर टीका करण्यास सुरुवात केली. मात्र असं असताना विराट कोहली अर्शदीपच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) पत्रकार परिषदेत युवा क्रिकेटर अर्शदीप सिंह याची पाठराखण करत स्वत:चं उदाहरण दिलं आहे.
'चुकी कुणाकडूनही होऊ शकते. हा एक मोठा सामना होता आणि परिस्थिती खूपच कठीण होती. मला आठवते की, पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत होतो, आमचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होता. शाहिद आफ्रिदीच्या चेंडूवर मी खूप वाईट शॉट खेळला. त्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत मी पंख्याकडे बघतच राहिलो. मला झोप येत नव्हती. मला वाटले की आता मला संधी मिळणार नाही आणि माझे करिअर संपले आहे. पण या सर्व गोष्टी नॅच्युअरली होतात. तेव्हा पुनरागमन करण्याची गरज असते. संघातील वातावरण चांगले असताना तुम्हाला शिकायला मिळते.', असं विराट कोहलीने सांगितलं.
विराट कोहलीने संघासाठी सकारात्मक वातावरण सुनिश्चित करण्याचे श्रेय रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाला दिले. दुसरीकडे, भारताचा सुपर 4 फेरीतील दुसरा सामना 6 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि तिसरा सामना 8 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. भारताने हे दोन्ही सामने जिंकले तर अंतिम फेरीत पुन्हा एकदा पाकिस्तानशी गाठ होणार आहे.