Asia Cup 2022: फ्रीमध्ये IND VS PAK मॅच कशी आणि कुठे पाहाल? इथे पाहा लाईव्ह स्ट्रिमिंग
Asia Cup 2022: इंडिया-पाकिस्तान सामना पहायचाय? तोही फ्रीमध्ये...या ठिकाणी तुम्ही पाहा लाईव्ह स्ट्रिमिंग
IndvsPak Asia Cup 2022 : आशियाई क्रिकेटचा हा महाकुंभ आजपासून सुरू होणार आहे. अफगाणिस्तान आणि श्रीलंकेमध्ये पहिला सामना होणार आहे. त्यानंतर 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तानमध्ये हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. जगभरातील क्रिकेट सामने या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना पाहण्यासाठी ज्यांच्याकडे चॅनलेचं किंवा अॅपचं सब्सक्रिप्शन नाही त्यांनाही भारत-पाक सामन्याचा थरार पाहता येणार आहे. (INDvsPak Asia Cup 2022 )
आशिया चषक सामन्याचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर दाखवले जाणार आहेत. स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी वन आणि स्टार स्पोर्ट्स वन हिंदीवर पाहता येणार आहेत. मात्र ज्यांच्याकडे सब्सक्रिप्शन नाही त्यांना फ्री डीसीएच (डीडी फ्री डिश) वरच्या डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर सामना तुम्हाला पाहता येणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 28 ऑगस्ट रोजी दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. आशिया कप 2022 चा भारत विरुद्ध पाक सामना हॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.
आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल , रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान
आशिया चषक 2022 साठी पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर ., नसीम शाह, शाहनवाज धानी, उस्मान कादिर आणि मोहम्मद हसनैन.