Asia Cup 2023, India vs Pakistan Playing 11: एशिया कप स्पर्धेत करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलेल्या भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याला आता काही तासांचा अवधी उरला आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर (R.Premadasa Stadium Colombo) सप्टेंबरला हे दोनही संघ आमने सामने येतील. या सामन्याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे पाकिस्तनाविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन (Team India Playing XI) कशी असणार याची चर्चा सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

3 वाजता सुरु होणार सामना
भारत-पाकिस्तान सामना म्हटल्यावर क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता है सामना सुरु होणार आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान 2 सप्टेंबरला झालेला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता दुसऱ्या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. पण 10 सप्टेंबरला सामना झाला नाही तर 11 रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. 


प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होणार
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू संघात परतले आहेत. यातलं पहिलं नाव आहे जसप्रीत बुहराह (Jasprit Bumrah). टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज. गेल्या आठवड्यात बुमराह बाबा झाला. त्याची पत्नी संजना गणेशनने मुलाला जन्म दिला. यासाठी बुमराह भारतात परतला होता. त्यामुळे नेपाळविरुद्धच्या सामन्यात बुमराह खेळ शकला नव्हता. तर दुसरा खेळाडू आहे के एल राहुल  (KL Rahul). दुखापतीमुळे राहुल पहिल्या दोन सामन्यात खेळू शकला नव्हता. पण आता तो पूर्णपण फिट आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात बुमराह आणि राहुल खेळणार आहेत. 


या तीन खेळाडूंना बसावं लागणार बाहेर
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तीन खेळाडूंना बेंचवर बसावं लागणार आहे. यातलं पहिलं नाव आहे वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा. एशिया कपमध्ये आतापर्यंत प्रसिद्धला एकदाही संधी मिळालेली नाही. दुसरं नाव आहे सूर्यकुमार यादव. भारताच्या पंधरा खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार यादवचं नाव आहे, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याला संधी देण्यात आलेली नाही. पाकिस्तानविरुद्धही त्याला संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. 


भारतीय संघाता नंबर चारसाठी श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे दोघं दावेदार आहेत. या दोघांपैकी एक जण पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यास ईशान किशनला आपली जागा बदलवी लागणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ईशान किशनने दमदार कामगिरी केली होती. दिग्गज फलंदाज फ्लॉप ठरत असताना ईशानने 82 धावांची खेळी करत टीम इंजियाला सन्मानजनक धावसंख्या उभी करुन दिली होती. 


या यादीत आणखी एक नवा म्हणजे तिलक वर्मा. टीम इंडियाची सध्याची प्लेईंग इलेव्हन पाहता तिलक वर्माला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरवण थोडं अवघडच वाटतंय. या सामन्यात मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेललाही बसावं लागणार आहे.


पाकिस्तानविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.