Asia Cup 2023: एशिया कपसाठी टीममध्ये अचानक `या` खेळाडूची एन्ट्री; सिलेक्टर्सची मोठी घोषणा
ACC Asia Cup 2023: पाकिस्तान विरूद्ध नेपाळ यांच्यात मुलतानमध्ये सामना सुरु असून या स्पर्धेच्या सुरुतावातीलाच एक मोठी घटना घडली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 6 टीम्स खेळणार असून स्पर्धा सुरु होण्याच्या काही तासांअगोदर टीमच्या स्क्वॉडमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
ACC Asia Cup 2023: अखेर क्रिकेट चाहत्यांना ज्याची उत्सुकता होती, तो दिवस आलाच. आजपासून एशिया कपला ( Asia Cup 2023 ) सुरुवात झाली आहे. पाकिस्तान विरूद्ध नेपाळ यांच्यात मुलतानमध्ये सामना सुरु असून या स्पर्धेच्या सुरुतावातीलाच एक मोठी घटना घडली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 6 टीम्स खेळणार असून स्पर्धा सुरु होण्याच्या काही तासांअगोदर टीमच्या स्क्वॉडमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यावेळी एशिया कप ( Asia Cup 2023 ) साठी टीममध्ये अचानक 30 वर्षांच्या एका खेळाडूला एन्ट्री देण्यात आली आहे.
अचानक टीममध्ये करण्यात आला 'या' खेळाडूचा समावेश
टूर्नामेंट सुरु होण्याच्या काही तासांअगोदर बांग्लादेशाच्या टीमला एक मोठा झटका लागला. टीमचा स्टार ओपनर लीटन दास संपूर्ण एशिया कप ( Asia Cup 2023 ) मधून बाहेर झाल्याचं दिसून आलं. दरम्यान या स्पर्धेमध्ये लिटन दासच्या जागी 30 वर्षांचा विकेटकीपर अनामुल हक बिजॉय ( Anamul Haque Bijoy ) ला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. गुरुवारी होणाऱ्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात अनामुलला संधी देण्यात येऊ शकते.
अनामुलची कामगिरी कशी आहे?
अनामुल हक बिजॉय (Anamul Haque Bijoy) ने आतापर्यंत 44 वनडे सामन्यात 30.58 च्या सरासरीने 5 अर्धशतकं आणि 3 शतकं ठोकली आहेत. यावेळी त्याने 1254 रन्स केले आहे. गेल्या डिसेंबरमध्ये त्याने शेवटचा वनडे सामना खेळला होता. अनामुल हक बिजॉय विकेटकीपर म्हणून टीममध्ये एन्ट्री घेणार आहे. मुश्फिकुर रहीमला तो बॅकअप म्हणून येणार आहे.
बांगलादेशाचे चीफ सिलेक्टर मिन्हाजुल आबेदीन यांनी सांगितलं की, अनामुल स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतोय. आम्ही बांगलादेश टायगर्स शेड्यूलमध्ये त्याच्यावर नजर ठेवली होती.
आशिया कपसाठी कशी आहे बांगलादेशाची स्क्वॉड?
शाकिब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसैन, तौहीद हृदयोय, मुश्फिकुर रहीम, अफीफ हुसैन, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम, नसुम अहमद, शक महेदी हसन, नईम शेख , शमीम हुसैन, तंजीद हसन तमीम, तंजीम हसन साकिब आणि अनामुल हक बिजॉय.