मुंबई : आशिया कपसाठी (Asia cup)  बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघ (team india) जाहीर केला आहे. या संघात काही अनुभवी तर काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर काही अनुभवी खेळाडूंचा संघातून बाहेर आहेत. हे खेळाडू संघातून का आऊट झालेत याचे कारण जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कप (Asia Cup) 27 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.  या स्पर्धेसाठी भारताचा संघ (team india) जाहीर करण्यात आला आहे. या संघात इग्लंड आणि वेस्ट इंडिजविरूद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.अर्शदीप सिंह,आवेश खान आणि रवि बिष्णाई या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तर विराट कोहली आणि दिनेश कार्तिक सारखे सिनियर खेळाडू संघात आहे. आणि श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर या तीन खेळाडूंना स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले आहे.


'हे' खेळाडू संघातून बाहेर 
या संघात अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहला (jasprit bumrah) स्थान मिळालं नाहीए. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला संघातून वगळणार असल्याची चर्चा होतेय. ती अखेर खरी ठरलीय. तर बुमराहसह हर्षल पटेलला (harshal patel)  देखील दुखापत झाली आहे. त्यामुळे तो ही संघातून आऊट झाला आहे.  सध्या जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलवर बंगळुरू येथील एनसीएमध्ये उपचार सुरू आहेत.


भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (व्हीसी), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर जडेजा, आर अश्विन, वाय चहल, आर बिश्नोई, भुवनेश्वर कुमार , अर्शदीप सिंग, आवेश खान.