India vs Sri Lanka Asia Cup 2023 Final: एशिया कपचं आठव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी टीम इंडिया (Team India) सज्ज झाली आहे. एशिया कप 2023 स्पर्धेची फायनल रविवारी म्हणजे 17 सप्टेंबरला खेळवण्यात येणार असून भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka Final) आमने सामने आहेत. सुपर-4 मध्ये पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंकेने अंतिम फरीत धडक मारलीय, तर सुपर-4 मध्ये सलग दोन विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने बेंच स्ट्रेंथला संधी दिली होती. पण हा प्रयोग यशस्वी ठरला नाही, आता अंतिम फेरीत भारतीय संघाच्या प्लेईंग 11 (Playing XI) मध्ये मोठे बदल पाहिला मिळणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम सामन्यासाठी भारताची प्लेईंग XI
अंतिम सामन्याआधी सुपर-4 च्या सामन्यात टीम इंडियातील प्रमख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. आता या सर्व खेळाडूंचं अंतिम सामन्यासाठी संघात पुनरामन होईल. यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या या मॅचविनर खेळाडूंचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि शुमभन गिल डावाची सुरुवात करतील हे निश्चित आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीची जागा पक्की आहे. 


मधली फळीतील फलंदाज
मधल्या फळीत चौथ्या क्रमांकावर विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल फलंदाजीला येईल.  पाचव्या क्रमांकावर ईशान किशनची जागा निश्चित आहे. सूर्यकुमार यादवला या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. टीम इंडियाच उपकर्णधार हार्दिक पांड्या ऑलराऊंडर म्हणून सहाव्या क्रमांकवर तर रविंद्र जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. 


गोलंदाजीत बदल होणार 
एशिया कप स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या कुलदीप यादवला संघाबाहेर ठेवण्याची चूक रोहित शर्मा करणार नाही. वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज प्लेईंग इलेव्हनमध्ये असणार आहेत. पण ऑलराऊंडर अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता आहे. 


एशिया कपमधला रेकॉर्ड
एशिया कपमध्ये टीम इंडियाच्या नावावर सर्वाधिक जेतेपदं आहेत. टीम इंडियाने आतापर्यंत तब्बल अकरावेळा एशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यातल्या सातवेळा टीम इंडियाने एशिया कपवर नाव कोरलं आहे. 


टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग XI
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह


श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग XI
पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चैरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), डुनिथ वेलालेज, दुशान हेमंथा, मथीशा पथिराना, प्रमोद मदुशन