Asia Cup final Qualification Scenarios : श्रीलंका आणि बांग्लादेश (SL vs BAN) यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेने बांग्लादेशच्या नागिन डान्सचा बदला घेतला. श्रीलंकेने बांग्लादेशचा 21 धावांनी पराभव केलाय. आशिया कपच्या फायनलच्या रेसमधून बांग्लादेश जवळजवळ बाहेर गेल्यात जमा आहे. त्याआधी पाकिस्तान आणि बांग्लादेश (PAK vs BAN) यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांग्लादेशला लाहोरच्या मैदानात धुळ चारली होती. अशातच आता श्रीलंकेच्या विजयानंतर आता पॉईंट्स टेबलचं (Asia Cup Points Table) गणित अधिकच रंगतदार झाल्याचं पहायला मिळतंय. फायनलमध्ये कोणता संघ जाणार? असा सवाल आता विचारला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपर 4 मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश या चार संघांनी एन्ट्री केलीये. त्यामुळे आता प्रत्येक संघ एकमेकांशी भिडणार आहे. त्यामुळे आता सुपर 4 मध्ये एकून 6 सामने पहायला मिळतील. सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्ताने बांग्लादेशविरुद्ध विजय मिळवून 2 अंक खात्यावर जमा केलेत. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांग्लादेशचा काटा काढून 2 अंक मिळवले आहेत. त्यामुळे आता भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यात बांग्लादेश जिंकला तरी त्याचे 2 अंक होतील. मात्र, नेट रनरेट कमी असल्याने बांग्लादेश बाहेर जाण्याची पूर्ण शक्यता आहे.


फायनलमध्ये (Asia Cup final) कोण जाणार?


सध्या सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जो संघ जिंकेल, त्याची फायनलची वाट सुटसुटीत होणार आहे. पाकिस्तान आज जिंकला तर पाकिस्तान फायनलमध्ये क्वालिफाय करेल, अशी पूर्ण शक्यता आहे. तर दुसरीकडे भारत जिंकला तर पाकिस्तानचं गणित अवघड होणार आहे. तर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या सामन्यावर फायनलचं गणित ठरणार आहे.


सुपर 4 मधील सामने-


पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश (PAK vs AFG) -  6 सप्टेंबर
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश (SL vs BAN) - 9 सप्टेंबर
भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) - 10 सप्टेंबर
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) - 12 सप्टेंबर
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (PAK vs SL) - 14 सप्टेंबर
भारत विरुद्ध बांग्लादेश (IND vs BAN) - 15 सप्टेंबर
फायनल सामना - 17 सप्टेंबर


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.


पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ.


श्रीलंकाचा संघ : पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (wk), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (क), दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा, मथीशा पाथिराना.


बांग्लादेशचा संघ : मोहम्मद नईम, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन (C), तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, मुशफिकुर रहीम (WK), अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, हसन महमूद.