नवी दिल्ली : भारतीय हॉकी टीमने देशवासियांना दिवाळीचं एक मोठ गिफ्ट दिलं आहे. गुरुवारी संपूर्ण देश दिवाळी साजरी करत असताना दुसरीकडे भारतीय हॉकी टीमने बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या आशिया चषकमध्ये दमदार विजय मिळवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी टीमने मलेशियाचा ६-२ने पराभव केला आहे. आता शनिवारी पून्हा भारताची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.


मॅचच्या १५व्या मिनिटाला भारताच्या अक्षदीप सिंह याने पहिला गोल केला. यानंतर चार मिनिटांनी हरमनप्रीत सिंहने जबरदस्त गोल करत टीमला मजबूत स्थितीत नेलं. त्यानंतर उथप्पा, गुरजंट सिंह, एसव्ही सुनिल आणि सरदार सिंह यांनीही प्रत्येकी १-१ गोल केले.


बुधवारी झालेल्या मॅचमध्ये भारतीय हॉकी टीमने मॅच संपत असताना शेवटच्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे भारताला कोरियाविरुद्ध १-१ या स्कोरने मॅच ड्रॉ करता आली. अन्यथा भारताला पराभवाचा सामना करावा लागला असता.


भारत आणि दक्षिण कोरिया या दोन्ही टीम्स एकमेकांना बरोबरीत टक्कर देत होत्या. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात दोन्ही टीम्समध्ये संघर्ष पहायला मिळाला. मात्र, कुठल्याही टीमला गोल करण्यात यश आलं नाही. त्यानंतर तिसऱ्या सत्रात दक्षिण कोरियाने ४१व्या मिनिटाला गोल करत भारतावर १-०ने आघाडी घेतली.