दुबई : आशिया कपमधील भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) देखील या सामन्यात उपस्थित होता. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टीम इंडियाच्या त्या एका खेळाडूची एकचं चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे नेटकरी असेही म्हणतायत, ती आली पण तो मैदानातचं दिसला नाही. त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे अशी चर्चा सामन्या दरम्यान रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत - पाकिस्तान सामन्या दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) टीम इडियाला चीअर करताना दिसली. अनेकदा स्क्रिनवर तिला भारताचा झेंडा फडकवताना दाखवण्यात आले. या संबंधित तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो व्हायरल होताच ऋषभ पंतची (Rishabh Pant) देखील चर्चा सुरु झाली. कारण नुकतंच या दोघांमध्ये सोशल मीडियावर मोठा वाद झाला होता. त्यामुळे नेटकरी उर्वशी आणि पंतला घेऊन अनेक कमेंट करतायत.


एका नेटकऱ्याने तर ऋषभ पंतला (Rishabh Pant) डिवचलं आहे, त्याने कमेटं केली आहे की, ती आली पण तो आलाचं नाही. त्याचा एकूणच असा अर्थ होता की, उर्वशी रौतेला सामना पाहण्यासाठी आली आणि ऋषभ पंतला (Rishabh Pant)  प्लेईंग ईलेव्हेन मध्येच संधीच मिळालं नाही. त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्याने व उर्वशी रौतेलाच्या  (Urvashi Rautela) उपस्थितीमुळे ऋषभ पंतची चर्चा सुरु झाली होती. 


ऋषभ पंतच्या (Rishabh Pant)  चर्चेसह दोघांमधील वादाचीही चर्चा सुरु झालीय. त्यामुळे दोघांमधील नेमका वाद काय होता तो जाणून घेऊय़ात. 


नेमका वाद काय? 
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठा वाद सुरु आहे. विशेष म्हणजे या वादात दोघेही एकमेकांचं नाव न घेता आरोप करत आहेत. अभिनेत्रीनं एका क्रिकेटरला डेट करत असल्याचा दावा केल्यानंतर उर्वशी आणि ऋषभ पंत यांची नावं जोडली गेली होती. मात्र, ऋषभनं अशा सर्व बातम्यांचे खंडन करत उर्वशीला (Urvashi Rautela)  सोशल मीडियावर ब्लॉकही केले होते.


मुलाखतीत उर्वशी काय म्हणाली?
एका मुलाखतीत उर्वशीने (Urvashi Rautela) दावा केला होता की, दिल्लीत तिच्या एका शूटिंगदरम्यान कोणीतरी तिला भेटण्यासाठी रात्रभर वाट पाहत होतं. तो म्हणाला, 'मिस्टर आरपी (RP) हॉटेलच्या लॉबीत आले आणि मला भेटायला थांबले. 10 तास त्यांनी मला फोन केले. मी मात्र इतकी थकले होते की मी गाढ झोपी गेले आणि मला त्यांचा फोन येऊन गेला लक्षातच आलं नाही. वगैरे वगैरे... खूप काही ती बोलली. पण, जेव्हा RP कोण? असा प्रश्न विचारला तेव्हा मात्र मी नाव नाही सांगणार असंच तिनं स्पष्ट केलं होत. 


ऋषभची उर्वशीबद्दल पोस्ट?
काही दिवसांनंतर ऋषभनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक नोट शेअर केली होती, ज्यामधून त्याच्या चाहत्यांनी असा अंदाज लावला होता की त्यानं ती पोस्ट उर्वशीसाठी लिहिली होती. विशेष म्हणजे यामध्ये त्यानं कोणाचेही नाव घेतले नव्हतं. ऋषभने लिहिले की, 'प्रसिद्धी आणि बातम्यांमध्ये राहण्यासाठी काही लोक मुलाखतींमध्ये कसं खोटं बोलतात हे विचित्र आहे. काही लोकांना नाव कमावण्याची आणि प्रसिद्ध होण्याची भूक असते हे पाहणं दुःखदायक आहे. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो. या पोस्टसोबतच्या हॅशटॅगमध्ये ऋषभने लिहिले की, 'मेरा पीछा छोड़ो बहन और झूठ की भी लिमिट होती है'. ही पोस्ट लिहून ऋषभनं  (Rishabh Pant) डिलीट केली होती. 


उर्वशीचं ऋषभला प्रत्युत्तर 
उर्वशीनं  (Urvashi Rautela) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये उर्वशी म्हणाली, 'छोटू भैय्याने बॅट बॉल खेळायला पाहिजे. मी काही मुन्नी नाही, जी तुझ्यासारख्या लहान मुलांसाठी बदनाम होईल. छोटू भैयाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. शांत बसलेल्या मुलीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नका, अशा प्रकारचं प्रत्युत्तर तिने ऋषभ पंतच्या  (Rishabh Pant) आरोपावर केले होते. 


ऋषभ पंतचा पलटवार 
ऋषभ पंतने  (Rishabh Pant) इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये एक मेसेज लिहिला आहे. या मेसेजमध्ये 'ज्या गोष्टींवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही त्यावर ताण देऊ नका' असे लिहण्यात आले आहे. या मेसेजचा अर्थ असा लावण्यात येत आहे की, समोरून होणाऱ्या आरोपांवर तुम्ही कुठल्याही प्रकारचं नियंत्रण ठेवू शकत नाही. मात्र एक गोष्ट तुमच्या हातात आहे ती म्हणजे, जास्त ताण घेऊ नका. ऋषभ पंतच्या या स्टोरीचा हा स्क्रिनशॉट आता तुफान व्हायरल होत आहे.दरम्यान ऋषभ पंतने या मेसेजच्या माध्यमातून उर्वशी रौतेला प्रतिउत्तर दिल्याचं बोललं जातंय. दोनचं दिवसांपुर्वी तिने ऋषभ पंतचा (Rishabh Pant) उल्लेख 'छोटू भैया' आणि 'आरपी' करत आरोप केले होते.  


उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंतमध्ये साधारणपणे अनेक आठवडे हा वाद रंगला होता. या वादात दोघेही एकमेकांचे नाव न घेता बेछुट आरोप करत होते. यानंतर संध्या हा वाद शमला असल्याची चर्चा आहे. मात्र आजच्या सामन्यात उर्वशी दिसल्याने पुन्हा एकदा दोघांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती.