Kapil Dev on Virat  Kohli :  भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली फॉर्ममध्ये नसल्याने भारतासाठी मोठी चिंता होती. आशिया कपमधील पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात विराटने चांगली सुरूवात केली होती. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. अशातच भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी विराटबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटला पुन्हा मैदानात पाहून आनंद झाला. मी काही शॉट्स पाहिले ते खरच अप्रतिम होते. विराटने आता आणखी आत्मविश्वासाने खेळावं. पाकिस्तानच्या सामन्यामध्ये तो भाग्यवान ठरला नाहीतर पहिल्या षटकात बाद झाला असता. कोहलीचा खेळण्याचा अंदाज मला आवडतो, जो त्याचा गेल्या 10 वर्षांपासून आहे, असं कपिल देव म्हणाले.


खेळाडूला प्रत्येक सामन्यामध्ये धावा करता येईल असं नाही. प्रत्येकवेळी तो शून्यावर बाद होईल असंही नाही. मला वाटतं की कोहलीमधील क्षमता,आणि प्रतिभा पाहता त्याला पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. विराटकडून फक्त एका मोठ्या खेळीची प्रतिक्षा आहे ती लवकरच येईल, असा विश्वासही कपिल देव यांनी व्यक्त केला.


कारकिर्दीमध्ये चढ-उतार हे होत असतात हे विराटने समजून घ्यायला हवं असा सल्लाही कपिल देव यांनी दिला आहे. कोहली भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा पहिला  खेळाडू ठरला आहे.