मुंबई : आशिया कप 2022 (Asia cup) ची सुरुवात येत्या 27 ऑगस्टपासून होणार आहे. या कपसाठी नुकताच बीसीसीआयने टीम इंडियाचा संघ जाहीर झाला आहे. या संघात विराट कोहली आणि के एल राहूलचं पुनरागमन झालं आहे. दरम्यान टीम इंडियाचा संघ मजबूत असला तरी हे दोन खेळाडू आशिया कप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. कोण आहेत हे खेळाडू जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा पहिला सामना सर्वात मोठा प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. आशिया कप (Asia cup) जिंकण्यासाठी भारत प्रबळ दावेदार मानला जात आहे. दरम्यान कर्णधार रोहित शर्माकडे असे 2 खेळाडू आहेत, ज्यांच्यात कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद आहे. हे खेळाडू आहेत हार्दिक पंड्या आणि के एल राहूल. 


पहिला खेळाडू
आशिया कप 2022 मध्ये हार्दिक पांड्या (hardik pandya) मोठी भूमिका बजावू शकतो. जेव्हा एखादी मोठी स्पर्धा जिंकायची असते व संघाला गरज असताना मैदानात टीचून फलंदाजी करून संघाला सावरायचे असते तेव्हा हार्दिक पांड्या मोलाची भूमिका बजावू शकतो. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही बाबतीत हार्दिक पांड्या  (hardik pandya) सर्वोत्तम आहे. हार्दिक पांड्या भारतासाठी सर्वात मोठा गेमचेंजर ठरू शकतो. 


दुसरा खेळाडू
सूर्यकुमार यादवच्या  (suryakumar yadav) रूपाने भारताला असा स्फोटक फलंदाज मिळाला आहे, जो मैदानात 360 अंशाच्या कोनात चौकार-षटकार मारू शकतो. आशिया चषक 2022 साठी सूर्यकुमार यादव खूप महत्त्वाचा आहे.एबी डिव्हिलियर्स ज्या प्रकारचे फटके मारतो तशीच क्षमता सूर्यकुमार यादवमध्ये आहे. सूर्यकुमार यादवला भारताचा एबी डिव्हिलियर्स म्हटले जाते. 


सूर्यकुमार यादवकडे डाव हाताळण्याची तसेच सामना संपवण्याची दुहेरी क्षमता आहे. सूर्यकुमार यादवसारखा प्रतिभावान खेळाडू आशिया कपमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावून देऊ शकतो. 


दरम्यान हे दोन्ही खेळाडू टीम इंडियासाठी महत्वाचे आहेत. या दोन्ही खेळाडूंची बॅट चालली तर टीम इंडिया नक्कीच आशिया कप उंचावू शकतो.